शेतकऱ्यांना सरकारने धोका दिला- राकेश टीकैत

Update: 2022-02-01 12:45 GMT

मोदी सरकारने बजेटमधून शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्या आरोप शेतकरी नेते राकेश टीकैत यांनी केली आहे. या सरकारने शेतकऱ्यांना धोका दिला आहे, या शब्दात शेतकऱ्यांना कर निधी. सन्मान निधी, दोन कोटी रोजगार, किमान हमीभाव, बी-बियाणं, डिझेल आणि किटकनाशकांवर कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. किमान हमीभावा संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे.


२०२१-२२ मध्ये हमीभावाचे बजेट २ लाख ४८००० कोटी होता तर २०२२-२३च्या बजेटमध्ये हाच आकडा २ लाख ३७ हजार कोटी एवढा कऱण्यात आला आहे. त्यातही हमीभाव फक्त गहु आणि तांदळापुरता मर्यादित असल्याची टीका त्यांनी केली आहे. सरकारला बाकीचे पीकं हमीभावाने विकतच नाही घ्यायची नाही, असाही आरोप त्यांनी केला आहे.

Similar News