फरदड कापसापासून शेतकऱ्याची लॉटरी; लाखोंचा उत्पन्न

फरदड कापूस शेतकऱ्यांनी घ्यायचे टाळावे असे कृषी विभागाकडून (agriculture department)सातत्याने सांगण्यात येते. मात्र या धोरणाला पाचोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने खोटे ठरवले आहे. त्यांनी चक्क याच फरदड कापसापासून दीड लाखांवर उत्पन्न घेतले आहे.

Update: 2023-04-06 07:21 GMT

 फरदड कापूस शेतकऱ्यांनी घ्यायचे टाळावे असे कृषी विभागाकडून सातत्याने सांगण्यात येते. मात्र या धोरणाला पाचोरा तालुक्यातील एका शेतकऱ्याने खोटे ठरवले आहे. त्यांनी चक्क याच फरदड कापसापासून दीड लाखांवर उत्पन्न घेतले आहे.

फरदड कापसापासून शेतीचा नुकसान तर होतोच परंतु बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो. आणि याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे फरदड कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेऊ नये, असे कृषी विभागाच्या वतीने वारंवार सांगितले जाते. मात्र कृषी विभागाच्या या धोरणाला किंवा आहवानाला जळगावातील पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रुक येथील शेतकरी विश्वास आनंदा पाटील यांनी खोटे ठरवले आहे.

शेतकरी विश्वास पाटील यांची खडकदेवळा बुद्रुक शिवारात तीन एकर शेतजमीन आहे. त्यात त्यांनी यंदा कापसाची लागवड केलेली होती. त्यामुळे इतर पिकाच्या लागवडीचे खर्च टाळण्यासाठी त्यांनी यंदा फरदड कापसाचे उत्पन्न घ्यायचे ठरवले. तर चक्क १ लाख ६३ हजार आठशे रुपयांचा २१ क्विंटल कापूस इतका विक्रमी उत्पन्न झाला. त्यांना दहा - अकरा क्विंटल उत्पन्न होतील असा अंदाज होता. परंतु त्यांचा अंदाज फोल ठरत दिड लाखांच्या वर उत्पन्न आज त्यांना झाला आहे. त्यामुळे खऱ्याअर्थाने एकप्रकारे त्यांची लॉटरीच लागली आहे. याच कारणामुळे सदर शेतकरी हे सर्वच ठिकाणी चर्चिले जात असून शेतकऱ्यांनी फरदड कापसाचा उत्पन्न घ्यावा जेणेकरून त्याठिकाणी नवीन पीक लागवडीसाठी लागणार खर्च टळेल. व चांगल्याप्रकारे उत्पन्न आपल्याला होतील. असे आवाहन शेतकरी विश्वास पाटील यांनी 'मॅक्स किसन'शी संवाद साधतांना केले आहे.

Tags:    

Similar News