अडचण आली पण शेतकरी थांबला नाही..

भले किती अडचण येतील परंतु थांबणार नाही.. अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याने आता मजूर टंचाईचा उपाय कपाशी लागवडी यंत्राने काढला आहे पहा.. शेतकऱ्यांच्या धाडसाचा ग्राउंड रिपोर्ट..

Update: 2023-06-12 02:30 GMT


नंदुरबार जिल्ह्यात मान्सून पूर्व कापूस लागवडीचे लगबग, मंजूर टंचाईमुळे टोचन यंत्राच्या साह्याने कापूस लागवडीला प्राधान्य

Full View

 नंदुरबार जिल्ह्यात बागायतदार शेतकऱ्यांकडून मान्सूनपूर्व कापूस लागवडीची लागवड सुरू झाली असली तरी मजुरांच्या कमतरतेमुळे कापूस लागवडीवर परिणाम होत आहे. आता शेतकऱ्यांनी नवीन पद्धतीने म्हणजे टोचन मशीन द्वारा कापूस लागवडीला प्राधान्य दिले आहे. एका मजुराच्या साह्याने दिवसभरात पाच एकर कापसाचे लागवड करता येत आहे. यामुळे मजुरीचा खर्च तसेच बियाण्याचाही खर्च वाचण्यास मदत होत आहे जमिनीत योग्य खोलीवर आणि योग्य अंतरावर लागवड होत असल्याने उगवण क्षमता ही चांगली होईल असे दिसून येईल.

नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी एक लाख 40 हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापूस लागवडीची शक्यता आहे. मात्र मजूर कमतरतेमुळे कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या उभी राहिली होती. यासाठी शेतकऱ्यांनी मार्ग काढत कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली हरभरा आणि मका लागवडीसाठी असलेल्या टोचन यंत्राचा साह्याने कापूस लागवड सुरू केली असून यातून कमी बियाण्यात आणि समान अंतरावर कापसाची लागवड होत असल्याने शेतकऱ्यांना मजूर टंचाई पासून दिलासा मिळाला आहे.




 

पाच एकर कापूस लागवडीसाठी 10 ते 15 मजुरांची गरज भासत होती. त्यासाठी दिवसाला तीन हजार रुपयापर्यंत मजुरी मजुरांना द्यावी लागत होती. तसेच कापसाचे बियाणेही जास्त लागायचे आणि कापूस च्या दोन झाडातील अंतर कमी जास्त होत असल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावरही होत होता. मात्र या मशीनच्या सहाय्याने कापूस लागवड केल्यास मजुरीच्या पैशात आणि बियाण्याच्या पैशातही बचत होत असल्याचे शेतकरी लालसिंग राजपूत यांनी सांगितले.

कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कापूस लागवडीचे प्रात्यक्षिक केल्यानंतर या मशीन द्वारे कापूस लागवडीचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला त्यानुसार शेतकऱ्यांनी या मशीनचा उपयोग केला. यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. मनुष्यबळ उपलब्ध नसतानाही वेळेत कापसाची लागवड पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. बाजारात विविध कंपनी द्वारा मका आणि हरभरा लागवडीसाठी हे मशीन उपलब्ध होते मात्र आता त्याचा वापर कापूस लागवडीसाठी होत आहे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा.संजय उत्तरवार त्यांनी सांगितले.


Tags:    

Similar News