बैल पोळ्यावर महागाईचं संकट

Update: 2022-08-25 10:42 GMT

सोलापूर : वाढत्या महागामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला असून आता सण उत्सवांवर देखील त्याचा परिणाम दिसू लागला आहे. शुक्रवारी साजरा होणाऱ्या बैल पोळ्याच्या सणावर देखील महागाईचे सावट आहे. बैल पोळ्याचा सण शेतकऱ्यांसाठी मोठा उत्सवच. पण सध्या बैल सजवण्यासाठी बाजारात आलेल्या वस्तुंच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी हैराण झाले आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी शेतकरी वर्ग कमी प्रमाणात येताना दिसतो आहे. पूर्वी शेतकरी बैल पोळ्याच्या सणाला दोन हजार रुपयांच्या आसपास माल खरेदी करत होता. पण वाढत्या महागाईमुळे शेतकरी आज सातशे ते आठशे रुपयापर्यंत माल खरेदी करू लागला आहे. बाजारातील स्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..

Similar News