रिपब्लिकवर थेट कारवाई का नाही?

Update: 2020-10-08 13:54 GMT

टीआरपी घोटाळ्या झाल्याचा गवगवा करत मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. पण २ छोट्या चॅनेलच्या संपादकांना अटक करणाऱ्या पोलिसांनी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक च्या मालकांना, संपादकांना का अटक केली नाही??? असा सवाल मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी विचारला आहे.

"मला वाटत नाही अर्णब टीआरपी चा घोटाळा करत असेल. पण मला खात्री आहे की देशातील काही उद्योगपती विरोधी पक्षांचं नामोनिशाण संपवण्यासाठी रिपब्लिक सारख्या चॅनेल्सना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या पैसे पुरवत असतात.

आता मुंबई पोलीसांची हिंमत असेल तर या कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकांना पकडून दाखवावं... जसजशी केस पुढे सरकेल, यातले बरेच पैलू आपल्याला ढीले झालेले दिसतील.

आजची पत्रकार परिषद ही धमकवण्यासाठी आहे. मराठी वाहिन्यांच्या मालकांना अटक आणि रिपब्लिक च्या मालकांना समन्स पाठवायची तयारी?? हे काही पचत नाही. कमजोरांना कधीही ठोकता येतं.. त्यांचा आवाज छोटा असतो.. मुंबई पोलिसांनी रिपब्लिक च्या मालकांना, संपादकांना का अटक केली नाही???

स्कोर सेटल करायला इतकी शक्ती आणि यंत्रणा वापरली, आणि अटक केली मराठी वाहिन्यांच्या मालकांना! ज्याला मारायचं त्यावर थेट हल्ला करा, असा लपून छपून, स्वत:चा जीव वाचवत हल्ला करण्यात काय अर्थ आहे."


Tags:    

Similar News