२० कोटीहून अधिक भटक्या-विमुक्त्यांची कधी होणार जनगणना?

Update: 2021-09-04 12:51 GMT

सध्या देशभरात (2021) जनगणनेच्या पार्श्वभूमीवर जातनिहाय जनगणनेच्या मागणीवरून राजकारण तापलं आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचं आरक्षण स्थगित केल्यानं ओबीसी समाजामध्ये संताप आहे. त्यातच गेल्या 90 वर्षांपासून विकासाच्या परिघाबाहेर असलेल्या भटक्या विमुक्त्यांची जनगणना कधी होणार? असा सवाल (DNT-RAG) चे संस्थापक डॉ. गणेश देवी यांनी केला आहे.

भारतात भटक्या विमुक्त्यांची लोकसंख्या २० कोटीहून अधिक असून ६६६ प्रजाती आहे. विकासापासून कोसोदूर असलेल्या भटक्याविमुक्त्यांची जनगणना यंदा झाली नाही तर आणखी १०० वर्ष या भटक्या विमुक्त समाजाला स्वतःचा हक्क, अधिकार मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. त्यांची लोकसंख्याच माहिती नसेल तर सरकार त्यांचा विकास कसा करणार? त्यांना त्यांचा हक्क कसा मिळवून देणार? असा सवाल डॉ. गणेश देवी यांनी सरकारला केली असून भटक्या विमुक्त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे.

Similar News