इंदुरीकर तुम्ही प्रबोधनकार, कीर्तनकार नसून कॉमेडियन आहात, तृप्ती देसाई यांची टीका
इंदुरीकर तुम्ही प्रबोधनकार, कीर्तनकार नसून काॅमेडियन आहात. दुसऱ्यांना सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असा शब्दात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर यांच्यावर टीका केली आहे. नुकतेच इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा पार पडला असून त्यात झालेल्या अवाढव्य खर्चामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.