Pune Challenges - 5 : प्रश्न पुण्याच्या पाण्याचा !

कोठे चाललंय पुणे ? शहाण्यांच्या पुण्यात आता कठोर भूमिका घेणाऱ्या वेड्यांची गरज आहे. पुण्यात, उपनगरात होणारी अवाढव्य बांधकामे/टॉवर्स पाहता वाढत्या लोकसंख्येला पाणी आणणार कोठून ? वाचा राजेंद्र कोंढरे यांचा लेख पुण्यातील आव्हाने भाग -५

Update: 2026-01-13 04:11 GMT

Pune कोठे चाललेय पुणे ? शहाण्यांच्या पुण्यात आता कठोर भूमिका घेणाऱ्या वेड्यांची गरज आहे. ज्या उमेदवारांच्या प्रचारात ‘विकास’ हा शब्द आहे त्या प्रत्येक उमेदवाराला हे पाठवा आणि एक तरी प्रश्न विचारा आकाशात धरण बांधता येईल का ?

Pune Water Crisis खडकवासला, पानशेत, वरसगाव टेमघर धरण पाणीसाठा 29.15 TMC, पुणे शहराला पाणी पुरवठा व ग्रामीण भागास शेती व पिण्यासाठी उपलब्ध आहे. सन 2031 च्या 76.16 लाख लोकसंख्या धरून 14.61 TMC पाणी मनपास मंजूर ( खडकवासला प्रकल्‍प प्रकल्प 11.60 पवना 0.34 भामा आसखेड 2.67 एकूण 14.61 ) दैनंदिन प्रतिमाणसी पाणीवापर MWRRA मापदंडानुसार 150 लिटर अपेक्षित/प्रत्यक्षात वापर 198 लिटर होतो असा जलसंपदा विभागाचा दावा आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणचा मनपास पाणी वापर वार्षिक 11.50 TMC नियंत्रितचा आदेश, प्रत्यक्षात 20.77 TMC वापर. पहा प्राधिकरण आदेश https:mwrra.maharashtra.gov.in/wp-contentuploads2025/11/55.%20MWRRA%20CASE%20NO.%2014-2018-929.पडफ


म.ज.नि.प्रा.चे दि.29/3/2022 मधील आदेशाप्रमाणे

​​"नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या पाणी वाटपाच्या आधारावर ​​​सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) पूर्ण ​​क्षमतेने कार्यरत नसल्या अनुज्ञेय दराच्या 2 पट दराने आकारणी केली​​​ जाईल."या प्रमाणे पुणे मनपास मे 2016 ते डिसेंबर 2024 मानक दराच्या दुप्पट दराने आकारणी करण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या म्हणण्यानुसार पुणे शहरासाठी मान्य असलेला व आवश्यक पाणीकोटा 2032 ची 76 लोकसंख्या गृहीत धरून 16.36 टिएमसी मंजुरी असली तरी आज रोजी धरणातून उचलण्यात येणारे पाणी – 21.11 TMC

२०२३-२४ ची शहराची पाण्याची आवश्यकता 24 TMC टी.एम.सी. मुळशी धरणातून 5 टी.एम.सी. पाणी उपलब्ध होण्यासाठी मागणी आहे. पुढील 15 वर्षाचा विचार करता सुमारे 12.26 TMC वाढीव (एकूण 26.08 TMC.) पाणी कोटा शासनाकडून मंजूर व पुरवठा होणे आवश्यक आहे. हे महापालिकेचे म्हणणे आहे.

पुण्यात, उपनगरात होणारी अवाढव्य बांधकामे/टॉवर्स पाहता वाढत्या लोकसंख्येला पाणी आणणार कोठून ? भूगर्भात पाणी जिरवायची पुणेकरांची इच्छा नाही, आकाशात धरण बांधण्याएवढा चमत्कार होणार नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बिल्डरनी करण्याच्या हमीवर बांधकाम परवानगी देणाऱ्यांनी, पाऊस कमी पडला तर पाणी आणणार कोठून याचा विचार केलाय का ? 

राजेंद्र कोंढरे 

Similar News