'विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ येत्या १४ डिसेंबरला वाचकांसाठी नवी कांदबरी

'कोण जाणे? पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठोबा उभ्या उभ्याच अठ्ठावीस युगांचा एखादा डुलका घेत असेल तर? कांदबरीकार विनायक होगाडे यांनी लिहिलेली बहुचर्चित कांदबरी ’विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ येत्या १४ डिसेंबर रोजी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने वाचा या कादंबरीतील एका प्रकरणाची झलक...

Update: 2025-11-27 07:24 GMT

(ही गोष्ट फक्त देवाची God नाही. ती देवविषयक मानवी धारणांची आहे. ही गोष्ट फक्त आजची नाही. ती सिंधू नदीच्या खोऱ्यात वसलेल्या मानवी संस्कृतीपासून ते तैग्रीस-युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यातील पहिल्या-वहिल्या माणसाची आहे. ही होमो सेपियन्सची गोष्ट आहे, ती निअँडरथल्सची गोष्ट आहे, ती डेनिसोव्हन्सची गोष्ट आहे, ती होमो हॅबिलिसची गोष्ट आहे आणि ती अगदी होमो फ्लॉरेसिएन्सिस या माणसाच्या प्रजातीचीही गोष्ट आहे. ही घडत-बिघडत-वाढत गेलेल्या माणसांच्या संस्कृत्यांची गोष्ट आहे. ही कथा, मिथककथा, उपकथा, लोककथा, लोकसंस्कृती  stories, myths, legends, folk tales, folk culture, history आणि लोकांच्या इतिहासाची गोष्ट आहे. पर्यायाने ही माणसांची गोष्ट आहे. सध्या तुमच्या धर्मविषयक धारणा काहीही असोत. तुम्ही धार्मिक असाल, निधर्मी असाल, धर्मचिकित्सक असाल, धर्मविरोधक असाल, धर्म उदासीन असाल, धर्म सुधारक असाल, धर्मभोळे असाल, धर्मप्रेमी असाल, धर्मांध असाल वा परधर्मद्वेषी असाल... ही तुमचीच गोष्ट आहे. त्यामुळे, तुम्ही देव मानत असाल, तर ही तुमचीच गोष्ट आहे. तुम्ही देव मानत नसाल, तरीही ही तुमचीच गोष्ट आहे.

'कोण जाणे? पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठोबा उभ्या उभ्याच अठ्ठावीस युगांचा एखादा डुलका घेत असेल तर?’ हे या कादंबरीचं गृहितक आहे. या गृहितकावर ही कादंबरी उभी आहे.

‘बोलावा विठ्ठल, Tukoba पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, Vitthal जीवभाव’ या तुकोबांच्या उक्तीप्रमाणेच मी हा विठ्ठल जीवाभावाने ‘करुन पाहिला’ आहे. साकारून पाहिला आहे. पण, शेवटी हा माझा पांडुरंग आहे. ही आमच्या दोघांच्या अद्वैतातून साकारलेली कृती आहे. कदाचित दुसऱ्या एखाद्याचा पांडुरंग याहून वेगळा असू शकतो. असायलाही हरकत नाही. शेवटी ‘ज्याचा त्याचा पांडुरंग!’ हा कल्पनाविलास रचताना मला प्रचंड मजा आलेली आहे. ‘तुका ह्मणे कंठ सद्गदित दाटे, या विठोबाच्या अंगसंगे रे’ असा अनुभवही अनेकदा आला. कल्पनेची रंजकता, विचारांच्या भराऱ्या मारण्याचा मोद, काळाच्या मर्यादा ओलांडण्याची गंमत या सगळ्याचा आनंद वेगळाच असतो. तो या कादंबरीच्या निमित्ताने मी पुरेपुर अनुभवलाय. एकंदर मला या कथेत प्रचंड मजा आलेली आहे. वाचकांनाही ही कादंबरी वाचताना मजा येईल, अशी मला आशा आहे.)

(‘विठोबा मिसिंग इन पंढरपूर’ ही कादंबरी येत्या १४ डिसेंबर रोजी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने वाचा या कादंबरीतील एका प्रकरणाची झलक…)

“आबा… ” विठोबानं शांतपणे हाक मारली.

“जी…” तो इसम डोळे उघडत अत्यंत नम्रपणे म्हणाला.

“कुठंचं तुम्ही? इथलं तर दिसत नाही जणू!” त्याच्या चेहऱ्यावर एकसारख्या तरळणाऱ्या त्या सूर्याच्या सोनेरी किरणांकडं पाहत विठोबा म्हणाला.

“जी भाईसाब, मैं मराठी बहुत कम जानता हूँ! वो भी हालफिलहाल में इस पंढरी में मैंने जो कुछ भी सिखी है उतनी सी ही. जैसे की, ‘भूक लागली है, भाकरी द्या!’” तो मनुष्य हसत हसतच म्हणाला.

“आप कहाँ से आये हो? और करते क्या हो?”

“जी… मैं काशी से आया हूँ और लोगों के भावनाओं को ठेस पहुँचाने काम बडे दिलोजान सें करता हूँ.” तो पुन्हा खळखळून हसू लागला.

विठोबा कोड्यात पडला. एवढ्या लांबून आलेला माणूस आणि उत्तरं तर अशी चित्र-विचित्र देतोय.

“मैं समजा नही.” विठोबा अभावितपणे म्हणाला.

“जी मैं बुनकर हूँ. बस, मेरी इतनीसी ही पहचान है. दिनभर बुनने का काम करता हूँ. उसी में कमाता हूँ. इतना कमाता हूँ की, मेरा कुटुम भी पेटभर खा सके और दरवाजे सें कोई साधू भी भूका ना जा सके.

कबीरा कहे,

साईं ऐता दीजिये जामें कुटुम समाय|

मैं भी भूखा न रहूं, साधु न भूखा जाय||

“कबीरा कहे?” विठोबा हबकला. “आप कबीर?” त्याच्या चेहऱ्यावर विस्मयकारी भाव उतरले नि त्याचे हात आपसुकच जोडले गेले. “मैंने आप के बारे में काफी सुना है!” विठोबा जरा सावरुनच सावध होऊन बसता झाला.

“कबीर पढ़िबा दूरि करि आथि पढूया संसार |

पीड़ न उपजी प्रीत सूं तो क्यों करि पुकार ||

अर्थात, इधर सब लोग बहुत कुछ पढते हुए दिखाई दे रहै है. अब पढ रहे है या रट रहे है, ये तो में नहीं जानता. पर अगर इन लोगों को प्रेम, वेदना और दु:ख के प्रति कोई सहानुभूतीही ना हो, तो उसका क्या ही फायदा? है ना?” कबीरानं प्रश्नार्थकपणे विचारलं.

“हम्म” विठोबानं रुकार दिला.

“पर वो सहानुभूती मुझे आप में दिखी. देखिये, मैं यहां राम ढुंढने यहाँ आया हूँ और मुझे आपही में राम दिखाई दिया.” तो पुन्हा शांत स्वरात म्हणाला.

“राम ढुंढने? काशी से यहाँ पंढरी?”

“मेरी मानों तो राम ना काशी में है और ना इस पंढरी में! राम तो अपने भीतर है. पर पंढरी का नाम बहुत सुना था और,

कलिजुग प्रथम नामदे भइया |

केसव अपने कर करि लइया ||

अगर पहली बार अपने हात में राम को कोई पकड सका है, तो वो है नामदेव! उनके जैसा भक्त जिस भूमी हुवा हो, उस भूमी को एक बार देखने की जिज्ञासा तो होगी ही ना? नामदेव, जनाबाई, चोखोबा… इतने सारे भक्त जिस पंढरी में पैदा हुए वो पंढरी है क्या? इसकी बड़ी जिज्ञासा मेरे मन में बहुत दिनों से मचल रहीं थी. पर खैर, पंढरी भी वैसी ही निकली…” तो हताश स्वरात म्हणाला.

“वैसी ही मतबल?” विठोबानं प्रश्न टाकला.

“अरे वैसी ही….

जत्रा में बिठाया फतरा,

तीरथ बनाया पानी।

दुनिया भयी दीवानी,

ये सब है पैसे की धुलधानी॥”

कबीरानं एकतारीची किनकीन केली नि तो पुढे बोलू लागला.

“जहाँ ये फतरावाला भगवान और सामने ऐसे बहते पानी को तीरथ बनाया हुवा हो, वहाँ पैसा ही सबकुछ हो जाता है. भगवान नहीं. यहाँ का भगवान तो मानो कमर पर हात धरे बैठे सो गया हो उस इट पर…” कबीर पुन्हा हसू लागला.

त्याचं ते हसणं विठोबाला बोचलं. मध्येच एक लहानशी वीज कडाडली.

“लगता है मेरा मजाक् आप को जचा नहीं. मैंने कहा था ना, मैं लोगों के भावनांओ को ठेस पहुंचाने का काम करता हूँ! हालांकी, मैं यहां के भक्तों जैसा सगुणी तो बिलकुल भी नहीं हूँ. मुरतवाले राम पे मेरा कतई विश्वास नहीं है. न जाने क्यों ये लोग राम को ऐसे मंदिर में बांध के रखते है. राम को तो मुक्त रहना चाहिए. अगर वो मुक्त रहेगा, तो आप भी मुक्त रहोगे ना?" विठोबाचा काळवंडलेला चेहरा पाहून कबीर म्हणाला.

“अगर आप निर्गुणी हो तो वो फतरे का भगवान सोया हुआँ हो या जागा? आप कों क्या?” विठोबानं प्रतिसवाल केला.

“वारकरी तो वो है, जो सवाल करता हो. आप सवाल बडे अच्छे करते हो. आप तो सच्चे वारकरी लग रहे हो जी. खैर मेरी मानो तो सवाल करना ही भक्ती है और अपने अंदर उसके जवाब ढुंढते रहना ही राम की खबर पाना है, आत्म-खबर पाना है.”

“आत्म-खबर? मतबल?” विठोबानं चौकसपणे विचारलं.

“खुद ही को जानना! स्व की खबर पाना. आत्म की खोज करना. जो खुद को जानता हो, वो ही राम को जान सकता है. इस पुरे संसार में अपना अस्तित्व कितना है और किस हद तक सीमित है, उसकी जानकारी पाना यही आत्म-खबर है. जीने का वजूद है. यही राम है. यही मोक्ष है.”

“लेकीन मोक्ष तो मरने के बाद मिलता है ना?” विठोबानं चौकसपणे विचारलं.

“मरने के बाद राम से मिल के क्या करोगे?” कबीराने प्रश्न केला. विठोबा निरुत्तरित झाला.

“मरने के बाद क्या ही बचेगा…? जी, आपका नाम क्या बताया आपने?” कबीरानं वाक्य बोलता बोलताच प्रश्न टाकला. 

“जी… विठोबा…”

“विठोब्बा…” तो पुन्हा मनमुरादपणे हसला. पण त्याचं हसणं कुत्सित नव्हतं. तो प्रचंड नम्रपणे बोलत होता. पण प्रचंड आडवे-तिडवे प्रश्न विचारत होता. पण त्याच्या बोलण्यात एक संथ लय होती. प्रश्नांमध्ये मात्र एक उद्धटपणा होता. पण तो उद्धटपणा माजातून आलेला नव्हता. मुक्तविचारातून आला होता. शहाणीवेतून आला होता. जाणवत होतं की त्यांनं कशातही स्वत:ला बांधून घेतलेलं नव्हतं. तो मुक्त होता. तो खोल होता. 


“विठोब्बा… जीवन खतम होने के बाद या खतम होने की कगार पर मिलनेवाली चीज कोई मोक्ष नही होती. यहीं तो दुनिया का भ्रम है. इसी भ्रम में लोग जीते है और इसी को राम समज बैठते है.” 

“तो ये आत्म-खबर मिलेगी कब? और कैसे?” विठोबानं सवाल केला.

“खुद की खबर पाने के लिए आपको किसी मुहूरत की जरुरत क्यो चाहिए? और कोई आप को वो घर बैठे ला के दे ऐसा बिचौली भी क्यों चाहिये?” कबीरानं प्रतिसवाल केला.

विठोबा विचारात पडला. काही क्षण स्तब्ध झाला.

“मोक्ष पाना मतलब जैसे आसमान में कोई बिजली चमक उठे वैसे ये कोई क्षणिक साक्षात्कार नहीं है. यह एक निरंतर चलनेवाली प्रक्रिया है. 

इतक्यात, कबिराने आपला डावा हात पुढे केला. त्यानं हाताच्या तर्जनीजवळ आपला अंगठा नेला. त्याची चिमूट केली नि तो काहीतरी चिमटीत पकडल्यासारखं दाखवत म्हणाला,

“अभी यही जो पल है…

देखो, देखो… जो आ रहा है…

देखो जो हम जी रहे है…

ये देखो… जो चला जा रहा है…

देखो जो अभी अभी चला भी गया है…

यही तो आत्म-खबर पाने का पल था. अगला पल भी है और उसके आगे भी आनेवाला है. हर एक पल में आप को राम ढुंढना है… ढुंढते रहना है.” 

तो काही क्षण शांत झाला. मंदिराच्या दिशेने पाहता झाला.

“किसी ने बरसो पहले जो राम ढुंढा हो, वो आज के पल का भी राम होगा, ये हम नहीं कह सकते है! जो मेरा आज का राम है, वो आनेवाले पाचसों साल बाद के लोगों का राम होगा, यह में भी नहीं कह सकता! मुझे कहना भी नहीं चाहिए. उनका राम तो उन लोगों को उनके पल के हिसाब से ही ढुंढना पडेगा ना?” कबीर प्रचंड पोटतिडिकीतून बोलत होता. त्याचं बोलणं प्रचंड गूढ आणि गहन वाटत होतं. विठोबा ते मंत्रमुग्ध होऊन ऐकतच बसला होता.

त्यानं एकतारी काढली नि तर्जणीने तिचा स्वर फक्त एकदा छेडला. एका तालमयी स्वराने किनकिन केली नि ती हळूवारपणे हवेत विरुनही गेली.

“देखा आपने? इस एकतारी की एक गुंज अभी अभी निकल के हवा में कैसे समा भी गयी. अगर आप कों वो फिरसे सुननी हो तो उसे आप को फिरसे छेडना पडेगा. उस स्वर को खोजना पडेगा. यही तो राम है. राम की खोज निरंतर है.”

कबीराच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तळपतं स्मितहास्य होतं. जणू काही उर्वरित जगाला जे दिसतं त्यापेक्षा त्याला एक वेगळंच जग दिसत होतं. त्याच्या डोळ्यांवर त्यानं एखादी वेगळीच दृष्टी पांघरली होती.

“तो वो दशरथपुत्र राम जिसने सीता को….” विठोबाचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच कबीर खळखळून हसू लागला. विठोबा मध्येच थांबला.

“जी, बोलो बोलो! मैं सून रहा हूँ!”

“नहीं मैं वो रामायण के बारे में बोल रहा था…” विठोबा अडखळत म्हणाला.

“रामायण तो कई सारी है और मैंने कुछ-कुछ पढी भी है. आप कौनसे रामायण के बारे बोल रहे हो? खैर, मेरी मानो तो, ऐसे किसी भी अवतार पर मेरा विश्वास नहीं है. कोई अवतार आएगा और हमें बचायेगा यह अपेक्षाही राम के खिलाफ है.”

“रामायण पर विश्वास नहीं पर राम पर है?” विठोबानं चिकित्सकपणे आडवा प्रश्न केला.

“जी… मेरा राम, रघू, रहिम, माधव, अल्लाह और विठ्ठल सब एकही है! जो एक है वही नेक है. यही मेरा राम है. मेरा राम मेरा सबसे करीबी दोस्त है. मेरे मन के लिए वह सुखद है. यह जो मेरे भीतर की सुखद भावना है, वही राम है. वो भीतर का राम और यह बाहरी जग इन दोनों में जो निरंतर संवाद है, वही भक्ती है. अपने भीतर को ज्यादा से ज्यादा प्रकास्य करो. वहाँ का अंधेरा दूर करो. जब आप ये कर पाओगे तब बाहरी अंधेरा अपने आप दूर कर पाओगे. और अंधेरे को दूर करना ही राम है. राम की भक्ती है”

कबीर पुन्हा काही क्षण थांबला. त्यानंतर तो उठला नि तो आत झोपडीत गेला. विठोबा जणू कबीराच्या प्रवाही बोलण्यावरुन तरंगत चालला होता. त्याला तसाच अनुभव येत होता. त्याचं प्रवाही आणि निर्मळ बोलणं त्याला कुठेतरी वाहत नेत असल्यासारखं जाणवत होतं. विठोबा त्याच्या बोलण्यावर विचार करत होता. त्याचं बोलणं थेट काळजाला भिडणारं होतं. जगावेगळं होतं. कबीर बाहेर आला. त्याच्या हातात मध्यम आकाराचा खडा चरखा होता. त्यानं तो खाली ठेवला.

“जी अब बोलिये. सोचा, क्यों ना बात करते करते ही राम को भी जन्म दिया जाए?” तो आपल्या मधुर स्वरात म्हणाला. 

“जी, आप जो बोल रहे हो वो भक्ती करे कैसे?” विठोबानं प्रश्न टाकला. 

“भक्ती?

प्रेम से.

विवेक से.

सहजता से.

राम से.”

त्यानं चरख्यावर सूत कताई सुरु केली. विठोबा चरख्याकडं जिज्ञासेनं पाहू लागला.

“मैं समजा नहीं?” विठोबासाठी सारंच नवं होतं.

“आप करिए, मैं आप को सिखाता हूँ. करिए… करिए...” कबीराने विठोबाच्या दिशेने चरखा सरकवला. 

विठोबाच्या समोर चरखा होता. 

“पैर पिछे लिजिए. सहजता से बैठिए. जो करने जा रहे हो, उसके प्रति मन में जिज्ञासा होनी चाहिए. बहोत सारे सवाल होने चाहिए. हमेशा ध्यान में रखिए, सवाल करना ही भक्ती है. अगर आप को कुछ सवाल हो तो जरुर पुछिएँ. मैं आप को सिखाता हूँ की, भक्ती की कताई कैसे की जाती है.” तो पुन्हा फुटकसं हसत म्हणाला. त्यानं विठोबाचा हात पकडला नि तो त्याला सूत कताई शिकवू लागला.

“देखिए इस कपास से जब धागा निकलता है तो कितना आनंद मिलता है. लेकीन ये आनंद आप को सिर्फ प्रेम से ही मिलेगा. किसी का घृणा कर के नहीं. क्रोध कर के नहीं. लेकिन इसका मतलब ये नहीं है की आपको सवाल नहीं करना है या बोलना नहीं है. जो गलत है उसपे चढाई करना भी भक्ती ही है. जो अविवेक है उसे दूर हटाना ही भक्ती है. अगर आप इस धागे को ज्यादा खिचोंगे या ज्यादती करोगे तो वो टूट जाएगा. है ना? देखो, टूट गया. तो किसी भी तरह की ज्यादती भक्ती नहीं होती. राम का नाम भी लेना हो तो वो भी सहजता से हो. रामनाम की भी ज्यादती करना राम की भक्ती नही है. ऐसी ज्यादती तो राम को भी नहीं जचेगी. इसलिए आप प्रेम व्यवहार से जो धागा निकाल रहे हो वहीं राम है. घृणा के साथ किया हुआ कोई काम राम का नहीं है.

ध्यान में रखिए, इस धागे के हिसाब से आप को अपने हात को भी हिलाना चाहिए. कई बार चरखे को पिछे भी घुमाना पड सकता है. जरुरत पडे तो वो भी करना पडेगा. लेकीन आगे जाओगे, तभी तो धागा निकाल पाओगे. राम को पाओगे. आगे जाना ही राम की तरफ जाना है. इसलिए यह विवेक होना भी जरुर है की, चरखा कब आगे किया जाए और कब पिछे. भक्ती का यह विवेक उस पल का निर्णय होता है. यह निर्णय आप को बार-बार लेना पडेगा. समय के हिसाब से. धागे के हिसाब से. कई बार विवेक से निर्णय लेेने के लिए खुद से सवाल अनिवार्य हो जाता है. कई बार हम अकेले भी पड सकते है. दुनिया में अकेले पडना गलत बात नहीं होती! अलग रास्ता ढुंढना गलत नहीं होता. बल्की में तो कहता हूँ की, जानेमाने रास्तो से चलने से अच्छा है खुद की राह ढुंढना. अगर आप ऐसे राहगीर हो, तो आप भक्त हो. विवेकी हो. विवेक एक सतत-निरंतर चलने वाली विचारविमर्शता है. यह विचारविमर्शता ही आप की आदत हो जानी चाहिए. यह विवेक बढ जाए, इसके लिए आप को प्रयास करना पडेगा. यह प्रयास इतना हो की वह सहज हो जाए. मानो की वो आप के पास आप के पैदा होने के वक्त के साथ से ही हो. करुणा, जिज्ञासा, चिकित्सा और संवेदनशीलता यही विवेक है.

देखों, ध्यान हटा तो धागा फिरसे टूट गया! भक्ती की कताई करते वक्त धागा टूट भी गया तो उसे फिरसे जोडना पडता है. जोडना ही भक्ती है. प्रेम है. राम है. तोडना नहीं. ये टुटा हुवा धागा आप कपास पे फिरसे रखोगे और चरखा घुमाओगे, तो वो अपने आपसे, सहजता से जुड जाएगा और धागा होने के प्रक्रिया मे सहज हो जायेगा. इस कपास की ये रेषाए उसे भी अपने आप में समा लेती है. यही सहजता आवश्यक है. ज्यादती नही. यही विवेक है, यही भक्ती है. यही राम है.” कबीर काही क्षण बोलायचं थांबला. विठोबा करत असलेल्या सूत कताईकडे एकटक पाहू लागला. त्यानं वर आकाशाकडे पाहिलं. एव्हाना ढग आणखी दाटून आले होते. अंधारुन आलं होतं.

“नयी राह खोजना मतलब नया धरम?” विठोबानं थेट सवाल केला.

“बिलकुल भी नहीं. मेरी मानों तो धरम और भक्ती, दोनों ही अलग है.” कबीर ठामपणे म्हणाला. आकाशात एक वीज जोरदारपणे कडाडली. पावसाची चाहूल लागली होती. 

“वो कैसे?”

“भक्ती कोई पूजापाठ की पद्धती नहीं है. इसके लिए कोई फतरा का भगवान, आरती, माला और उसकी पूजा की कोई जरुरत नहीं है. यह एक दृष्टी है. यह एक कसोटी है. मेरी मानों तो, मेरे राम की भक्ती मुझे यह बताती है की, इसी कसोटी को मिला के आप को धरम को ताडना है. मेरे हिसाब सें इस भक्ती में जो ना बैठे, वो सब चिजे अधरम है. मेरे भक्ती में जाती व्यवस्था नहीं बैठती, जो जात सें व्यवहार करता हो, वो भक्त नहीं है, ऐसा मेरा कहना है. जो कर्मकांड करता हो, वो भक्त नहीं है. जो धरम के परे जाता हों वही राम का भक्त है. वही रहिम का भक्त है.”

“तो आप मुसलमान भी नहीं हो और हिंदू भी?” विठोबानं सवाल केला. इतक्यात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. विठोबा ताडकन् उठू लागला. 

“हिन्दू कहै मोहे राम पियारा, मुसलमान रहमाना |

आपस में दोऊ लड़त मरत है, मरम न काहू जाना ||” उठून जाणाऱ्या विठोबाला अडवतच कबीरानं म्हटलं. 

“कहाँ जा रहे हो?”

“बारिश आ रही है न्?” विठोबानं म्हटलं.

“तो…?” कबीर पुन्हा खळखळून हसू लागला.

“इस बारिश को आप राम कहो या रहिम. ये सब के उपर समानही गिरती है. में खुद को हिन्दू बताऊँ या तुर्क. कुछ भी बताऊँ तब भी वो गिरती है और कुछ ना भी बताऊँ, तब भी वह गिरती है. तो यह बंधन चाहिए ही क्यों? धरम के बिना भी यह राम मिल सकता है, तो धरम का बंधन क्यो?

जोगी गोरख गोरख करै, हिन्दू राम नाम उच्चरै |

मुसलमान का एक खुदाइ, कबीर का स्वामी रह्या समाई ||

मेरा राम तो सभी चराचर में समाया है.” असं म्हणत तो हाता-तोंडावर पाण्याचे सडे घेऊ लागला. मनमुरादपणे. त्याला कसलाच धरबंध नव्हता. थोड्यावेळानं त्यानं झोपडीच्या आडोशाशी उभा राहिलेल्या विठोबालाही पावसात खेचलं नि भिजायला लावलं. त्यानं स्वत:ला कशाशीच बांधून ठेवलेलं नव्हतं. त्यानं कसल्याही प्रकारच्या धार्मिक परंपरा आणि रीती-रिवाज-रुढी-पद्धती यांपासून लांब ठेवलं होतं. त्याचा राम, गोरख, माधव, रहिम, खुदा सारं काही एकच होतं. हा त्याचा देव इतरांच्या देवांपेक्षा वेगळा होता, हे तो ठासून सांगत होता. पावसाला सुरुवात झाल्यावर सारे आडोशाला धावत होते, तेव्हा हा त्या पावसाचा मनमुराद आनंद घेत होता. कसल्याही बंधनाशिवाय मनमुरादपणे आनंद घेणं हाच त्याचा राम होता. कधी-कधी तो लोकांच्या जगण्यावर उपहास करायचा, विनोद करायचा नि टिंगलही करायचा तर कधी-कधी तो जोरदार टिका करुन वैचारिक तडाखेही द्यायचा. विशेष म्हणजे हे त्यानं आंधळेपणानं केलं नव्हतं. त्याची ही नवी दृष्टी अनुभवातून आल्याचं स्पष्ट दिसत होतं. त्यानं सर्व मार्ग आणि परंपरांचा बारकाईनं अभ्यास केला होता. त्यांची चिकित्सा केली होती आणि मगच त्यानं नवी वाट चोखाळली होती, जी जगावेगळी होती. म्हणूनच तो कोणत्याही कप्प्यात बसू शकत नव्हता. विशेष म्हणजे त्याचा स्वत:चाही वेगळा कप्पा नव्हता. त्याला कप्पाच नको होता. त्यानं आयुष्याचं मर्म जाणलं होतं. हे मर्म म्हणजे सगळ्या चराचरात राम आहे, चराचरात खुदा आहे.

‘हम सब मांहिं, सकल हम मांहिं, हम थैं और दूसरा नाहीं|’ म्हणजेच ‘मी प्रत्येक गोष्टीत आहे आणि प्रत्येक गोष्ट माझ्यात.’ असं त्याचं म्हणणं होतं. विवेक हाच त्याच्या जगण्याचा पाया होता. तीच त्याची स्वभान जागृती होती. असं वाटत होतं की, या जगात तो एकटाच भानावर होता. बाकी सारेच उन्मादात बेभान होते. 

 

- विनायक होगाडे

 (लेखक, कांदबरीकार, पत्रकार )

(‘विठोबा मिसींग इन पंढरपूर’ या आगामी कादंबरीतून…)

प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी संपर्क - 8287660460

Similar News