Savitribai Phule Poems : ‘इडा पिडा टळो’ या कार्यी भट न पडो, परंपरेच्या बेड्या तोडूनी शिकण्यासाठी उठा !

"शिकण्यासाठी जागे व्हा" या कवितेतून सावित्रीबाई फुले यांनी मांडलेली भूमिका आजही खूप महत्त्वाची... काय आहे कविता वाचा आणि विचार करा

Update: 2026-01-02 11:44 GMT

Savitribai Phule Poems ३ जानेवारी म्हणजे Savitribai Phule's birth anniversary क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन... नवीन वर्षाच्या सुरुवातीला सावित्री उत्सव अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतात. सावित्रीबाई फुले यांना स्मरण करताना त्यांनी लिहिलेल्या कवितेचं वाचन करत आहेत ॲड. परिक्रमा खोत...

उठा बंधुनो अतिशुद्रानो… जागे होऊनी उठा

परंपरेची गुलामगिरी हि   तोडण्यासाठी उठा

बंधुनो शिकण्यासाठी उठा ‖‖ धृ‖‖


गेले मेले मनु पेशवे  आंग्लाई आली

बंधि मनुची विद्या घेण्या  होती ती उठवली

ज्ञानदाते इंग्रज आले विद्या शिकुनी घ्यारे

ऐसी संधी आली नव्हती हजार वर्ष रे


मुलाबाळांना आपण शिकवू   आपण सुद्धा शिकू

विद्या घेउनी ज्ञान वाढवून    नितीधर्म हि शिकू

 नसा नसातून इर्षा खेळवू    विद्या मी घेईन

शुद्र्त्वाचा डाग हा माझा निपटून काढीन

राज्यात बळीच्या   आम्हास विद्या घडो

 यशाची आमच्या     दुदभी नगारे झडो

 ‘इडा पिडा टळो’ या कार्यी भट न पडो

असे गर्जुनी विद्या शिकण्या   जागे होऊन झटा

परंपरेच्या बेड्या तोडूनी   शिकण्यासाठी उठा

बंधुनो शिकण्यासाठी उठा ‖‖ धृ‖‖


Full View

Similar News