People's Manifesto : मतदारांनी दिला उमेदवारांना आपल्या प्रभागाचा जाहीरनामा !
काय आहे मतदारांचा जाहीरनामा? लोकप्रतिनिधींकडून कोणत्या आहे अपेक्षा आणि मागण्या सांगताहेत मृणालीनी जोग
People's Manifesto प्रत्येक निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने जाहीरनामा, वचननामा सादर करीत असतात परंतु यंदा मुंबईतील Z उत्तर वॉर्डमधील नागरिकांनी जाहीरनामा तयार करत जे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांना दिला आहे. तसेच यावर त्यांच्या सह्या देखील घेतल्या आहे.
Municipal Elections निवडणुकात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून स्पष्ट अपेक्षा आणि जबाबदाऱ्या ठरवल्या आहेत! उत्तर वॉर्ड सिटिझन्स फोरमच्या माध्यमातून मृणालिनी जोग यांनी 'जनतेचा जाहीरनामा' या मॅक्स महाराष्ट्रच्या विशेष कार्यक्रमात मतदारांचा जाहीरनामा (Citizens' Manifesto) सादर केला. हा जाहीरनामा गेल्या २५-३० वर्षांच्या अनुभवातून तयार करण्यात आला असून वॉर्डातील रहिवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
फोरमने वॉर्डातील नागरिकांशी अनेक बैठका घेऊन, त्यांच्या समस्या जाणून घेऊन हा जाहीरनामा तयार केला. त्यानंतर सुमारे ४०१ रहिवाशांच्या जाहीरनाम्यावर सह्या घेतल्या आणि त्यानंतर विविध पक्षांच्या ७-८ उमेदवारांनी या जाहीरनाम्यावर सही केल्या आहेत.
काय आहे पुढील ५ वर्षांसाठी मतदारांचा जाहीरनामा? लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा आणि मागण्या
प्रत्येक महिन्याला किंवा नियमित अंतराने वॉर्डातील रहिवाशांशी खुल्या बैठका घ्याव्यात आणि समस्या ऐकाव्यात व सोडवाव्यात.
बैठकींची आगाऊ तारीख आणि वेळ जाहीर करावी.
महानगरपालिकेच्या समिती बैठकी, बजेट, घेतलेले निर्णय याची पूर्ण माहिती रहिवाशांना द्यावी.
वॉर्डच्या एकूण बजेटमधून किती कामांना किती निधी मिळाला याची पारदर्शक माहिती द्यावी.
कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी रहिवाशांना आगाऊ माहिती द्यावी आणि प्रक्रिया पारदर्शक ठेवावी.
दरवर्षी मागील वर्षातील केलेल्या कामांचा सविस्तर अहवाल रहिवाशांना सादर करावा.
ट्रॅफिकची समस्या कायमस्वरूपी सोडवावी.
फूटपाथ अतिक्रमणमुक्त, चांगले प्रकाशित, खड्डेमुक्त आणि व्हीलचेअरसाठी वापरण्यायोग्य असावेत.
कचरा व्यवस्थापनाची समस्या तात्काळ आणि कायमस्वरूपी सोडवावी.
महिम बीच स्वच्छ, खुला आणि सर्वांसाठी सुरक्षित ठेवावा.
महिम कॉजवे (सँड पोर्ट) वर बीच ते हिंदुजा हॉस्पिटलपर्यंत चालण्याचा मार्ग किंवा कोणतेही नवीन बांधकाम करू नये.
वॉर्डात अनधिकृत होर्डिंग्ज (वाढदिवस, इतर जाहिराती) पूर्णपणे बंद करावेत; पुढील ५ वर्षांत कोणतेही होर्डिंग लावू देऊ नये.
रस्ते-गल्ल्यांमध्ये वारंवार खोदकाम टाळावे; सर्व विभागांमध्ये समन्वय साधून नागरिकांना आगाऊ सूचना द्याव्यात.
वॉर्डातील सर्व आरोग्य केंद्रे स्वच्छ ठेवावीत आणि आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात.