पर्यावरणाला सांभाळून विकास करा: प्रा. सोनकवडे

Update: 2021-06-05 05:54 GMT

गेल्या काही वर्षांपासून निसर्गसृष्टीवर आलेली संकट अर्थात चक्रीवादळाचं वाढतं प्रमाण, ज्वालामुखीचा उद्रेक, वणवा पेटणं, कोरोना महामारी या सर्वांचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. औद्योगिक क्रांती आणि विकासाला गती देण्याबरोबर पर्यावरणही सांभाळलं पाहिजे. मात्र, पर्यावरणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सध्या नैसर्गिक आपत्तीचे चित्र मोठ्या प्रमाणात समाजात पाहायला मिळत आहे.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण आणि विकास यावर प्रा. रा. जी. सोनकवडे मॅक्स महाराष्ट्राशी बोलत असताना ते सांगतात की...

जागतिक पर्यावरण दिनाचे यंदाचे घोषवाक्य Ecosystem restoration असं आहे. या घोषवाक्याचा अर्थ असा की, पुन्हा एकदा पर्यावरण पुर्नसंचलित करायची संधी आपल्याला मिळतेय. त्यामुळे पर्यावरण संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तसेच आत्तापर्यंत झालेल्या पर्यावरण दिनाच्या घोषवाक्याचा आढावा घेत मोठ-मोठ्या इमारती, सिमेंटाचं काम अशा विकासाला गती देताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. असं मत सोनकवडे यांनी व्यक्त केलं आहे.

Full View

Tags:    

Similar News