राष्ट्रीय चिन्हाचा अपमान ? अतुल भोसेकर

नुकतेच प्रधानमंत्र्यांनी (narendra modi)वीन बांधलेल्या संसदेवर ( Parliament) ठेवण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय शिल्पाचे उद्घाटन केले. या नवीन शिल्पात, चारही सिंहात दाखवलेला हिंस्त्रपणा कशासाठी? राष्ट्र चिन्हात बदल घडवून आणणे हे षडयंत्र आहे की शिल्पकराची चूक? आणि ज्यामुळे राष्ट्राचा अपमान होत आहे, असे शिल्प का मान्य करण्यात आले? असे प्रश्न लेणी अभ्यासक तज्ञ अतुल भोसेकर यांनी उपस्थित केले आहेत.

Update: 2022-07-12 09:59 GMT

 नुकतेच प्रधानमंत्र्यांनी (narendra modi)वीन बांधलेल्या संसदेवर ( Parliament) ठेवण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय शिल्पाचे उद्घाटन केले. या नवीन शिल्पात, चारही सिंहात दाखवलेला हिंस्त्रपणा कशासाठी? राष्ट्र चिन्हात बदल घडवून आणणे हे षडयंत्र आहे की शिल्पकराची चूक? आणि ज्यामुळे राष्ट्राचा अपमान होत आहे, असे शिल्प का मान्य करण्यात आले? असे प्रश्न लेणी अभ्यासक तज्ञ अतुल भोसेकर यांनी उपस्थित केले आहेत.

26 जानेवारी 1950 साली, भारत सरकारने सम्राट अशोक यांनी सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभावरील "सिंह शीर्ष" हे स्वंतत्र भारताची "राष्ट्रीय मुद्रा" म्हणून स्वीकारले.मुळात हे शिल्प आणि त्याच्या खाली असलेले हत्ती, बैल, दौडणारा घोडा आणि सिंह यांची कोरीव शिल्प हे भ.बुद्ध यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग अधोरेखित करते.

मानवतावादी, संपूर्ण प्राणीमात्रां विषयी करुणा व मंगल कामना असलेला बुद्ध विचार म्हणजेच धम्म याचे प्रतीक हा सिंह आहे. तो शांत आहे, स्वतंत्र आहे, त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आहेत व डोळ्यात दृढ निश्चय आहे. त्याचा जबडा नैसर्गिक रीत्या उघडलेला आहे. शिल्पकाराने अतिशय तन्मयतेने, संपूर्ण बुद्ध विचारांचे भाव या संपूर्ण शिल्पात कोरलेले पाहायला मिळतात. हे मानवतावादी विचार चारही दिशांना पसरावे म्हणून हे चार सिंह पाठीला पाठ लावून चार दिशांकडे तोंड करून आहेत. सम्राट अशोक यांना हे अभिप्रेत होते म्हणून त्यांना हा स्तंभ व हे शिल्प उभारले.

हेच मानवतावादी, सर्वांप्रती स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव विचार, स्वतंत्र झालेल्या भारताला सर्व जगात घोषित करायचे होते. म्हणूनच भारताच्या प्रथम मंत्रिमंडळाने एकमताने हे शिल्प, "राष्ट्रीय मुद्रा" म्हणून स्वीकार केले.

नुकतेच प्रधानमंत्र्यांनी नवीन बांधलेल्या संसदेवर ठेवण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय शिल्पाचे उद्घाटन केले.मात्र या नवीन शिल्पात, चारही सिंहांचे भाव अतिशय हिंस्र दाखवले आहेत ज्यामुळे मूळ शिल्पाचा आणि त्यात असलेल्या बोधाचा अपमान झाला आहे.सिंहात दाखवलेला हिंस्त्रपणा कशासाठी? राष्ट्र चिन्हात बदल घडवून आणणे हे षडयंत्र आहे की शिल्पकराची चूक? आणि ज्यामुळे राष्ट्राचा अपमान होत आहे, असे शिल्प का मान्य करण्यात आले?

आधुनिक लेझर तंत्रज्ञानाने मूळ शिल्पासारखेच अगदी हुबेहूब नवीन शिल्प तयार करता आले असते. मात्र जेथे मूळ विचारलाच तिलांजली द्यायची आहे, तेथे शिल्पात बदल होणे स्वाभाविक आहे.

या नवीन हिंस्र शिल्पाचा (राष्ट्रीय मुद्रेचा नव्हे) आणि ते साकार करणाऱ्या कंपनीचा व हे शिल्प मान्य करणाऱ्या सर्वांचाच जाहीर निषेध.


Tags:    

Similar News