BMC Election 2026 : सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महानगरपालिकेची निवडणुक खरंच वॉटर, मीटर, गटरची आहे का?
मुंबई महानगरपालिकेची निवडणुक खरंच वॉटर, मीटर, गटरची आहे का? मुंबईची नेमकी ओळख काय आहे? मुंबईतून मराठी माणूस बाहेर का फेकला जातोय? महाराष्ट्रातील उद्योजक मुंबईपासून दूर का? काय आहेत मुंबईतील प्रमुख समस्या आणि त्यावरील उपाय सांगताहेत कॉर्पोरेट वकील नितीन पोतदार
सर्वात श्रीमंत असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणुक काही दिवसांवर असताना मुंबईची ओळख नेमकी काय आहे? गरीब ते श्रीमंत असणाऱ्यांना मुंबई कशी हवी? रोजगारासाठी मुंबई का गरजेची? मुंबई महानगरपालिकेचा मुख्य अजेंडा काय असायला हवा? महापालिकेनं परडवणारी घरं कशी बांधता येईल यावर काय उपाय करावा ? महापालिकेनं स्टार्टअपसाठी काय करावं? उद्योजकता शिक्षण म्हणजे काय आणि का ते देणं गरजेचं? महाराष्ट्रातील उद्योजक मुंबईपासून दूर का? कॉर्पोरेट वकील नितीन पोतदार यांनी मुंबईतील प्रमुख समस्या आणि त्यावरचे उपाय यावर सविस्तर मांडणी केली आहे. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असली तरी मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिकांसाठी ती राहण्यायोग्य राहिलेली नाही, असा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईकर कसा मुंबईच्या बाहेर फेकला जातोय? तसेच मुंबईच्या प्रमुख समस्या कोणत्या ?
१. परवडणारी घरे नाहीत.
गेल्या १०-२० वर्षांत जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर २ बीएचके घर आता सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी परवडत नाही. १९६०-८० च्या दशकातील कुटुंबांना आता मोठी घरे हवी आहेत, पण त्यासाठी १ कोटींपेक्षा जास्त खर्च येतो. यामुळे महाराष्ट्रातील तरुण, कलाकार, बुद्धिजीवी आणि उद्योजकांना मुंबईत येऊन काम करण्याची संधी मिळत नाही.
२. मराठी अस्मितेचे संकट
१९६० साली संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई मराठी भाषिकांची राहिली, पण आता स्थानिक मराठी माणसांना विस्थापित होण्याची भीती आहे. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील सांस्कृतिक आणि आर्थिक दरी वाढत आहे.
३. संघटित संधींचा अभाव
मुंबईत फायनान्स, मीडियाचा, चित्रपटसृष्टी आणि स्टार्टअप्सचा उद्योग भरभराटीला आहे, पण स्थानिक आणि महाराष्ट्रातील तरुणांना या संधी मिळत नाहीत. तसा उपक्रम महानगरपालिकेकडून राबविला जात नाही.
मुंबईतल्या समस्यांवर काय उपाय करता येतील?
सिंगापूर, नेदरलँड्स आणि युनायटेड किंग्डम सारखे मोठ्या प्रमाणात सरकारी परवडणारी घरे बांधणे, सबसिडी, भाडे तत्त्वावरील घरं, जुन्या चाळी-झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करणे.
नवीन बांधकामांमध्ये ठराविक टक्के परवडणारी घरे बांधण्याची सक्ती.
मध्यमवर्गासाठी घर खरेदीवर सबसिडी देणे.
बीएमसीने शाळांमध्ये उद्योजकता शिकवणे, इन्क्युबेशन सेंटर्स उभारणे, स्टार्टअप इव्हेंट्स आयोजित करणे.
भ्रष्टाचारमुक्त प्रशासन सिंगापूरच्या धर्तीवर पारदर्शक एक खिडकी योजना, ई-टेंडर, नागरिकांना थेट सेवा घेण्याची सोय.
दरम्यान मुंबईकर बोलत नाही अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली होती त्यावर पोतदार यांनी सांगितले की, मुंबईकर सोशल मीडियावर नक्कीच आपली मते व्यक्त करतात, फक्त रस्त्यावर उतरत नाहीत. १५ जानेवारीला मतदान करण्यापूर्वी मुंबईकर म्हणून तुम्हाला मुंबई कशी हवी ? ही निवडणूक वॉटर, गटर, मीटरच्या पलिकडची कशी आहे? यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी