BJP Victory : काय मिळवलेत? अखिल चित्रेंचा एकनाथ शिंदे ना सवाल !

ज्या मुंबईत स्व. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापिली तिथून शिवसेना हद्दपार करण्याच्या कटाचे भागीदार होऊन काय मिळवलंत ? अखिल चित्रेंचा एकनाथ शिंदे ना सवाल !

Update: 2026-01-17 11:44 GMT

BMC Election Results 2026 मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर समाजमाध्यमावर अनेक नेटिझन्स कडून एकनाथ शिेंदे यांच्यावर टीका होऊ लागली आहे. महापालिका निवडणुकात भाजपचा विजय झाला. शिवसेनेच्या हातून मुंबई गेल्यामुळं अनेक जण आपल्या भावना व्यक्त करत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी एक्सवर वर पोस्ट करत काही प्रश्न महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले आहेत.

काय म्हणताहेत अखिल चित्रे वाचा

काय मिळवलंत ? एकनाथ शिंदे

स्वतःला शिवसेना आणि स्व. बाळासाहेबांचे पाईक म्हणवणाऱ्यांनो काय मिळवलंत ?

ज्या मुंबईत स्व. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापिली तिथून शिवसेना हद्दपार करण्याच्या कटाचे भागीदार होऊन काय मिळवलंत ?

“मुंबईत शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे!” ह्या स्व. बाळासाहेबांच्या निर्धाराला मूठमाती देऊन काय मिळवलंत ?

सत्तेच्या लाचारीत मश्गूल होऊन, शिवसेना फोडून, भाजपाला पाठिंबा देऊन मुंबई कमळीच्या दावणीला बांधून काय मिळवलंत ?

चिन्ह, पक्ष, नेते आणि नंतर शिवसेनेचे ५६ नगरसेवक फोडून निवडून आणलीत फक्त २८ माणसं, मग शिवसैनिकाला दुबळं करुन काय मिळवलंत ?

शिवसेनेचं प्रभुत्व नाकारून आता भाजपाचा महापौर होईल, राजधानीतून मराठी अस्मितेची तिरडी उचलून काय मिळवलंत ?

थैलीशहांना आपली मुंबई स्वार्थासाठी विकून काय मिळवलंत ? तुमच्याकडे एकंच उत्तर असेल कि, 'आलिशान आयुष्य मिळवलं' पण उद्या जेव्हा मराठी माणसाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मिंद्यांनो तुम्ही मुंबईतून शिवसेना संपवायच्या कटात सामील होतात ह्याची इतिहास नोंद घेईलच... आणि हा ठपका घेऊनच तुमचे वारसदार जगतील हे लक्षात ठेवा ! अर्थात फंद फितुरी ह्या मातीला नवीन नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनाही सर्वाधिक स्वकीयांविरुद्ध लढावं लागलं होतं. आम्हीही त्याच राजांचे मावळे तितक्याच त्वेषाने लढू... इथल्या खडकांवरसुद्धा दुहीची बीजं रुजतात असं म्हणतात ह्याचाच फायदा कमळीने घेतला पण एक निश्चित आम्ही राजधानी मुंबईतून ना स्व. बाळासाहेबांचा विचार फुसू देऊ, ना स्व. बाळासाहेबांची शिवसेना... अब याचना नहीं रण होगा


Similar News