राष्ट्रीय युवा दिन : संवेदनशील मनाचा युवा पोस्टमन

आपल्या परिस्थितीची चिंता न करता इतरांच्या मदतीला धावून जाण्याचे धैर्य खूप कमी लोक दाखवतात. पुण्यातील अशाच एका तरूण पोस्टमनची ही कहाणी....

Update: 2022-01-12 07:39 GMT

पूर्वी दळणवळणाची साधने देशातच नव्हे तर जगभरात खुप कमी होती.त्यामध्ये फक्त एकच माध्यम असे होते जे हजारो किमी दूर असणार्‍यांचा निरोप व संवादाची देवाणघेवाण पोहोचवण्याचं काम पिढ्यांनपिढ्या करायचा तो आजतागायत करत आला ते म्हणजे पोस्टखाते.. मागील दोन वर्षापासुन संपूर्ण जगावर एक करोना नावाचं महासंकट आले. अजूनही ते गेले नाही.पण त्या काळात माणुसकी जोपासणारी व जपणारी काही मोजकेच लोक होती.त्या अत्यंत खडतर दिवसांच्या आठवणी काहींनी अनुभवल्या, त्यातील एक म्हणजे मनोज राठोड हा युवक.

पुणे शहर तसं पाहीले तर स्थलांतरीत मंडळींनी बर्‍यापैकी सर्वांबाबतीत व्यापलेले. विशेषत:नोकरी व शिकण्यासाठी लाखो विद्यार्थी या ठिकाणी येतात. कालांतरांने कायमचं ते इकडचे राहतात. असाच एक मनोज राठोड नावाचा 22 वर्षाचा तरुण औरंगाबाद जिल्हयातुन कन्नड मधील "जैतखेडा तांडा"या छोटयाच्या खेडयातुन पुण्यात शिकण्यासाठी आला होता. त्याची परिस्थिती प्रचंड हलाखीची होती.बीए शाखेतुन पदवीचे शिक्षण फर्ग्युसन या नामांकित काँलेजमध्ये त्याने पूर्ण केले.

पदवी करत असतानाच शासकीय विभागातील नोकरीं मिळवण्यासाठी त्याने अभ्यास सुरु केला होता.त्याला हे करत असताना अंतिम वर्षालाच यश आले आणि तो पोस्ट खात्यामध्ये नोकरीला लागला.

त्यांची एक वर्षापासून नोकरी खडकी छावणी या ठिकाणी आहे. आताही तो तिथेच कार्यरत आहे. तो शहरातील मध्यवर्ती ठिकाणावरुन ते खडकी हा दररोज येण्या जाण्याचा प्रवास सायकलने करत होता. आपण पाहीले असे, करोनाची पहिली लाट ज्यावेळी आली अशरक्ष;सर्वांची दाणादाण उडली. होती. त्यावेळी दैनंदीन गरजा मिळवण्यासाठी लोकांना मार बसत होते. काही निर्बंध थोडे शिथील कधी होतील अशी आतुरतेने वाट लोक पाहत होती.

अशावेळी शासनाच्या अत्यावश्यक सेवा अहोराञ काम करीत होत्या. त्यामध्ये पोस्ट विभाग.. हा मनोज नावाचा त्यातील कर्तव्यदक्ष तरुण झपाट्याने काम करत होता. खरं म्हणजे या विभागातील काम खुप व्यापक स्वरुपाचं असते.त्या पोस्टविभागाला मोठी ऐतिहासिक पाश्वभुमी आहे.1854 साली ब्रिटीशांनी ते सुरु केली होती. आताही आपण पाहतो,पोस्ट खात्यातील कर्मचारी मंडळी सायकलीने प्रवास करुन घरोघरी जाउन पञव्यवहार व पार्सल देतात.

करोनाच्या काळात लोक कोणी कोणाला साधं बोलत नव्हतं,भेटत नव्हतं,कितीही जवळचा नातेवाईक असला त्याचे करोनानी निधन झाले तर कोणी हात सुद्धा लावत नव्हतं. एवढे भयावह प्रसंग होते.आजही त्या आठवणीने शहारे अंगावर येतात.

अशा वेळी या मनोज राठोड नावाच्या अतिशय संवेदनशील तरुणांनी लोकांना रेमडीसेवर इंशेक्शन,वृद्ध लोकांना औषध उपचार व निराधारांना धान्य उपल्बध करुन दिले. अशा प्रकारे आधार देण्याचे काम त्यांनी केले.

एवढेच नव्हे खडकी भागातील काही गुन्हेगार मंडळी तुरुंगात असताना त्यांचा निरोप,घरचा आणि नातेवाईकांचा संवाद करुन देणे.त्यांच्या दैनंदिन गरजांची देवाणघेवाण करुन देण्याची मदत त्यांनी केली.

हा त्याचा प्रवास शास्ञीरोड सेनादत्त पोलीस चौकी ते खडकी असा होता. सायकल वरुन तो 25-30 किमी दररोज प्रवास करायचा..करोना रुग्णांच्या घरी जाउन सर्व पञव्यवहार करायचा. हा तरुण अतिशय प्रामाणिकपणे व हिम्मतीने सर्वतोपरी मदत खडकी छावणी परीसरात लोकांना करत होता न थकता.न घाबरता.. त्याच्या वाटेला काही कटु प्रसंगही आले पण तो न डगमगता तसाच जोमाने हे व्रत घेउन काम करत होता..

त्यावेळा तर त्याच्या कुटुंबात खूप दूखद घटनाही घडल्या.पण तो त्यावरही मात करत तो कणखर पणे उभा राहिला. त्यावेळी त्याच्या घरातील दोन सदस्यांना करोनाची लागण झाली होती.त्यामध्ये त्याचे आजोबा व आत्यांचा करोनामुळे मुत्युही झाला. अशा संकटातही त्याला त्यावेळी घरी जाता आले नाही.जाणार तरी कसा ?सर्व काही बंद... अशा हळव्या,कर्तुत्वान व जबाबदारीचे भान असणार्‍या मनोजसारख्या संवेदनशील युवा तरुणांच्या कार्यकतुत्वाला सलाम त्याचे काम निश्चीतच कौतुकांस्पद व तरुणांना ऊर्जा देणारे आहे..


कुलदीप आंबेकर

Tags:    

Similar News