राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची भूमिका अँटी काँग्रेस – कुमार केतकर

Update: 2022-04-25 11:52 GMT

देशात मोदीविरोधी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसने करावे अशी भूमिका मोदी विरोधी पक्ष मांडतात पण त्यांची काँग्रेस विरोधी भूमिका सोडायला ते तयार नाहीत, या शब्दात काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी टीकी केली आहे. वर्धा येथे झालेल्या सर्वोदय संकल्प यात्रे दरम्यान कुमार केतकर यांनी ही टीका केली. देशात सध्या काँग्रेस पक्ष एकाकी पडला आहे, असे म्हटले जाते पण याचे कारण सर्व मोदीविरोधी पक्ष आहेत, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह सर्व मोदीविरोधी पक्षांनी कधी ना कधी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भाजपची साथ दिली आहे, या शब्दात कुमार केतकर यांनी टीका केली आहे.

शिवसेनाही काँग्रेसविरोधी आहे पण महाराष्ट्रात सध्या काँग्रेस शिवसेने सोबत आहे, ही साथ भविष्यात किती दिवस राहील ते आता सांगता येणार नाही, असेही वक्तव्य त्यांनी आपल्या भाषणात केले. या देशात काँग्रेसविरोध करुनच प्रत्येक पक्ष तयार झाला आहे, असे सांगत त्यांनी १९६७ पासून राममनोहर लोहिया यांच्यापासून अनेक नेते आणि पक्षांची उदाहरणं यावेळी दिली.

Full View

Tags:    

Similar News