राज्यपाल कुठे आहेत, संजय राऊतांचा सवाल

Update: 2022-07-14 07:06 GMT

राज्यात सरकार स्थापन झाले असले तरी अजूनही मंत्रालयाचे कामकाज ठप्प आहे, पावसामुळे अनेक लोत मृत्यूमुखी पडत आहेत, पण सरकार कुठे आहे, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. एवढेच नाही तर राज्यात शपथ घेतलेले सरकार बेकायदेशीर आहे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. घटनेचे पालन होत नाहीये, त्यामुळे राज्यपाल कुठे आहेत, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

एवढेच नाही तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबतही संजय राऊत यांनी सवाल उपस्थित केला आहे. मंत्रीमंडळ अजून का बनलेले नाही याचे उत्तर द्यावे अशीही भूमिका संजय राऊत यांनी मांडली आहे.

त्याचबरोबर राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेने पाठिंबा दिला असला तरी तो कोणत्याही राजकीय फायद्यासाठी पाठिंबा दिला नाहीये, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आदिवासी आहेत, शिवसेनेचे लोक देखील आदिवासींमध्ये काम करत आहेत, त्यामुळे मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

Full View

Tags:    

Similar News