पंकजा मुंडे यांची एन्ट्री कठीण? 10 कारणं कोणती?

विधान परिषद निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज आहेत. त्यांनी मौन धरले आहे. पण त्यांना विधिमंडळात एन्ट्री का मिळत नाहीयेत, याची काही कारणं चर्चेत आली आहेत.

Update: 2022-06-12 08:53 GMT

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची विधिमंडळातील एन्ट्री पुन्हा एकदा टळली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी एकही वक्तव्य केलेले नाही. पण त्यांचे समर्थक मात्र आता नाराजी व्यक्त करु लागले आहेत. कुणी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करतंय, तर कुणी टरबूज फोडून आपला संताप व्यक्त करतो आहे. पण पंकजा मुंडे या शांत का आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो आहेय 2 पंकजा मुंडे पक्ष नेतृत्वाविरोधात थेट का बोलत नाहीयेत, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याकडे राज्यात पक्षाकडून दुर्लक्ष का होते आहे याची कारणं आता चर्चेत आली आहेत.

पंकजा यांना एन्ट्री का मिळत नाहीये?

1. पंकजा मुंडे सातत्याने राज्यातील पक्ष नेत्यांविरोधात बोलत असल्याने दिल्लीतील पक्षश्रेष्ठी नाराज

2. बहुजन नेतृत्व आपणच करू शकतो म्हणून त्यांनी गोळाबेरीज केली होती, पण भाजपमध्ये अनेक बहुजन नेत्यांचा उदय



 



3. मुंडे परिवाराला पक्षाने अनेक पदं देऊनही पंकजा मुंडे नाराजी व्यक्त करत असल्याने पक्षातून सहानुभूती नाही

4. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी नाराजी ओढवून घेतली




 


5. पक्ष संघटनेच्या कार्यात पंकजा मुंडे यांनी गेल्या काही वर्षात योगदान दिले नसल्याची पक्षातील नेत्यांची भावना

6. पंकजा मुंडे मंत्री असताना चिक्की घोटाळ्याच्या आरोपामुळे फडणवीस सरकारची बदनामी झाल्याची तक्ररार

7. जनतेच्या प्रश्नांवरील आंदोलनांमध्ये सहभागाचा अभाव, राज्यभरात वावर कमी असल्याचे मत




 


8. पक्षातील इतर नेत्यांची साथ नसल्याने पंकजा यांच्या नाराजीची विशेष दखल घेतली जात नाही

9. केवळ गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने भावनिक राजकारण करण्यावर पंकजा मुंडे यांचा भर असल्याची टीका

10. धनंजय मुंडे यांच्या रुपाने आव्हान उभे राहिल्याने मतदारसंघातच अडकून पडण्याची वेळ




 


एकीकडे ही कारणं आहेत तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा वाढता राजकीय प्रभाव देखील पंकजा मुंडे यांना शांत बसण्यास भाग पाडत आहे का, अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना येत्या काळात आपल्या मतदारसंघाबाहेर पडून आपण ओबीसींचे राज्यस्तरीय नेतृत्व आहोत हे सिद्ध करावे लागेल, असेही मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

Tags:    

Similar News