विरोधी पक्षात असताना आम्ही रोज राजभवनावर येत नव्हतो- मुख्यमंत्री

Update: 2022-02-11 07:53 GMT

विरोधी पक्षात असताना आम्ही वर्षातून एखाद्यावेळीच राज्यपालांच्या भेटीला येत असायचो, दररोज येत नव्हतो, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. राजभवनात नव्याने बांधलेल्या अधिक दरबार हॉलचे उदघाटन शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. ऑपरेशननंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच एखाद्या शासकीय कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहिले. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.

मुख्यमंत्र्यांचा टोला

नुतनीकरण करण्यात आलेल्या या ऐतिहासिक वास्तुच्या उद्घाटन सोहळ्याला आपल्याला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहता आले, हे आपण आपले भाग्य समजतो, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पण विरोधी पक्षात होतो तेव्हा वर्षातून एखाद दोनवेळा शिष्टमंडळ राज्यपालांकडे आपल्या तक्रारी घेऊन येत होतो, पण आम्ही रोज काही येत नव्हतो, असा टोला विरोधकांना लगावला. राज्याचे राजभवन देशातील सगळ्यात चांगले राजभवन आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पण यावेळी त्यांनी आणखी एक टोला लगावला, राजकीय हवा कशीही असली तरी इथली हवा थंडच असते, असा टोला त्यांनी लगावला.

राज्यपालांचाही टोल

यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या भाषणात कोरोना काळात जनहितासाठी काम करणाऱ्या अनेकांचा आपण सत्कार केला, असे सांगितले. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांच्या संपर्कात आलो तर कोरोनाची बाधा होऊ शकते, असा इशारा आपल्याल काहींनी दिला होता, पण "आईने आपल्याला खूप करुणा दिली आहे, त्यामुळे कोरोना होणार नाही" असा आपल्याला विश्वास होता, असा टोला राज्यपालांनी यावेळी लगावला. तसेच कोरोना संकटकाळात, तसेच वनहक्कांसंदर्भात आपण स्वत: निर्णय घेतल्याचे यावेळी राज्यपालांनी सांगितले.

Tags:    

Similar News