नॉट रिचेबल एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया...

Update: 2022-06-21 11:00 GMT

 एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सोमवारी रात्रीपासून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 22 पेक्षा जास्त आमदार नॉटरिचेबल आहेत. त्यामुळे शिवसेनेची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे भाजपच्या संपर्कात असल्याचे सुद्धा म्हंटले जात आहे. हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असताना एकनाथ शिंदे यांनी आता एक सूचक ट्विट केले आहे. "आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. सत्तेसाठी कधीही प्रतारणा करणार नाही असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे

एकनाथ शिंदे हे सुरतमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्या ठिकाणी गुजरात पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान भाजपच्या गुजरातमधील काही नेत्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट देखील घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आहे. काल रात्रीपासून एकनाथ शिंदे नॉटरिचेबल आहेत त्यानंतर बारा तासाच्या या राजकीय नाट्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्या ट्विट मध्ये त्यांनी म्हंटले आहे की, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.

Full View

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर सर्व शिवसैनिकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मुंबई आणि राज्यातील आमदार पोहोचले होते. या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेते म्हणून निवड केली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर तीन प्रस्ताव समोर ठेवले असल्याचे सुद्धा म्हटले जात आहे. आता नक्की काय होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल..नॉट रिचेबल एकनाथ शिंदेनॉट रिचेबल एकनाथ शिंदे

Full View
Tags:    

Similar News