उध्दव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत होत आहेत ट्रेंड

Update: 2022-06-30 07:20 GMT

उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर संजय राऊत सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं काय आहे कारण? सर्वोच्च न्यायालयाने बहुमताच्या चाचणीला स्थगिती देण्यास नकार दिल्याने उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र त्यानंतर संजय राऊत सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले होते. त्यानंतर भाजपने माध्यमातील बातम्यांचा आधार घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सरकारला बहुमताची चाचणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने पत्र पाठवून उध्दव ठाकरे यांना बहुमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी आपल्या मुख्यंमत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर संजय राऊत ट्वीटरवर ट्रेंड होत आहेत. तर यामध्ये संजय राऊत यांना ट्रोल केलं जात आहे.

तन्मय कुलकर्णी यांनी एका कबरीचा फोटो ट्वीट केला आहे. तर त्यावर शिवसेनेचे पक्षचिन्ह दाखवण्यात आले आहे. या फोटोमध्ये संजय राऊत यांचा हे विजयी मुद्रा करून फोटो काढत असल्याचे दाखवण्यात आले आहेत. यामध्ये लिहीले आहे की, बॉलिवूडचे बेस्ट सीएम उध्दव ठाकरे यांचा राजीनामा, महाविकास आघाडी सरकार कोसळले. मॅन ऑप द मॅच संजय राऊत असं ट्वीट केलं आहे.

Full View

प्रदीप कुमार यांनी मीम्सचे ट्वीट केले आहे. त्यामध्ये उध्दव ठाकरे संजय राऊत यांच्यावर चिडल्याचे दाखवण्यात आले आहे.

Full View

अभिषेक कुमार या ट्वीटर अकाऊंटवर उखाड दिया असं लिहीलं आहे. त्यामध्ये नौटी संजय राऊत टू बेस्ट सीएम – उखाड दिया असं म्हटलं आहे. याबरोबरच सामनातील जुन्या बातमीचे हेडिंग वापरले आहे.

Full View

रवी वर्मा या ट्वीटर अकाऊंटवरून म्हटले आहे की, उखाड दिया – मॅन ऑफ द मॅच संजय राऊत. तसंच याबरोबर सामनाचे उखाड दिया हे हेडिंग वापरले आहे. तर उध्दव ठाकरे रडत असल्याचे व्यंगचित्र काढले आहे. त्यावेळी संजय राऊत आज क्या लिखू असं म्हणतानाचे व्यंगचित्र ट्वीट केलं आहे.

Full View

भाजपचे मोहित कंबोज यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, सगळ्या माध्यमांसाठी संजय राऊत डिसकनेक्ट झाले आहेत.

Full View

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुधीर सुर्यवंशी यांनी ट्वीट करून संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटचा अर्थ सांगितला आहे.

Full View
Tags:    

Similar News