संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ, अखेर गुन्हा दाखल

Update: 2023-02-20 07:30 GMT

शिवसेना आणि धनुष्यबाणाबाबतचा निर्णय झाल्यानंतर आता ठाकरे गट विरुध्द शिंदे गटात संघर्ष तीव्र झाला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष (Shivsena Party) आणि पक्षचिन्ह धनुष्यबाणाबाबत (Bow And Arrow) निर्णय दिल्यानंतर ठाकरे गट विरुध्द शिंदे गटातील (Thackeray Vs Shinde) संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. त्यातच संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sanjay Raut Comment on Eknath Shinde)

संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाटूगिरी करत असल्याचे वक्तव्य केले. तसेच मुख्यमंत्री शिंदे हे चाटूकार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे नाशिक येथील शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी योगेश बेलदार (Yogesh Beldar Nashik) यांनी पोलिसांमध्ये भादंवि कलम 500 नुसार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नाशिकमधील पंचवटी पोलिस ठाण्यात युवा सेनेचे पदाधिकारी योगेश बेलदार यांनी संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर बोलताना योगेश बेलदार म्हणाले, संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. एखाद्या नेत्यावर टीका करावी. पण ती योग्य भाषेत असावी. जर पोलिसांनी संजय राऊत यांना अटक केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून संजय राऊत आंदोलन करू, असा इशारा योगेश बेलदार यांनी दिला आहे.

Tags:    

Similar News