नवाब मलिक-दाऊद कनेक्शन? सोमय्यांचे पवार-ठाकरेंवर गंभीर आरोप

Update: 2022-05-21 08:12 GMT

नवाब मलिक हे दाऊद गॅगचे सदस्य आहेत हे सिद्ध झाले आहे, पण जेलमध्ये गेल्यानंतर नवाब मलिक यांना मंत्रीपदी कायम ठेवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचेपण दाऊदशी संबंध आहेत का, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे. उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी हजारवेळा शरद पवार आणि दाऊद यांचे संबंध आहेत, असा आरोप केला होता. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी पार्टनरशिप केली आणि शरद पवार यांची दाऊदशीही पार्टनरशीप आहे, असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Full View

गोवावाला कंपाऊंडमध्ये जे आर्थिक व्यवहार झाले ती कोट्यवधी रुपयांची मालमत्ता काही लाखात नवाब मलिकांना कशी काय मिळाली, असा सवाल सोमय्या यांनी उपस्थित केला आहे, तसेच आता मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचे प्राथमिक स्थितीत दिसत असल्याचे कोर्ट म्हणत आहे, त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांसोबत न्यायालयाविरोधात मोर्चा काढावा, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.

Similar News