Sambhaji Brigade | संभाजी ब्रिगेड लागले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकाच्या तयारीला

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला (Local Body Election) सामोरे जाण्यासाठी संभाजी ब्रिग्रेडने (Sambhaji Brigade) कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड येथे संभाजी ब्रिग्रेडने एका बैठकीचे आयोजन करुन निवडणुकाची रणनिती तयार केली आहे.

Update: 2023-02-06 16:16 GMT

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला (Local Body Election) सामोरे जाण्यासाठी संभाजी ब्रिग्रेडने (Sambhaji Brigade) कंबर कसली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड येथे संभाजी ब्रिग्रेडने एका बैठकीचे आयोजन करुन निवडणुकाची रणनिती तयार केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये (Beed) संभाजी ब्रिगेडने एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत संभाजी ब्रिगेडने आपल्या राजकारणाची पुढील दिशा काय असणार आहे याबाबत चर्चा केली. या चर्चेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ताकदीने सामोरे जाणार असल्याचे म्हटले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या शिवसेनेने (Shiv sena) संभाजी ब्रिगेड बरोबर याआधीच युती केली. त्यानंतर आता वंचित बरोबर आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने याचं स्वागत केलं आहे.



एकाच विचारधारेचे हे पक्ष एकत्र आल्यामुळे राज्यात निश्चितच सत्ताबदल होईल अशी आशा संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. तसेच राज्यात निश्चितच बदल होईल असा विश्वास सुद्धा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे अरबी समुद्रात न करता राजभवन परिसरात व्हावे, अशी प्रमुख मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडने केली आहे. ही मागणी राज्य सरकारकडे केली असून, याकडे दुर्लक्ष केले गेले तर महाराष्ट्रात आंदोलन छेडू, असा इशारा संभाजी ब्रिगेडने यावेळी दिला आहे.

Tags:    

Similar News