कृषी विधेयक केंद्र सरकार पुन्हा आणू शकते, भाजप खासदारांनंतर राज्यपालांचं मोठं विधान

Update: 2021-11-21 07:30 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. मात्र, भाजप नेते हे कायदे पुन्हा केले जाणार असल्याचं वक्तव्य करत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा एकदा संभ्रम निर्माण होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली होती. त्यांनंतर उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांनी 'केंद्र सरकार पुन्हा कृषी कायदा लागू करू शकते.' असं वक्तव्य केले होते. साक्षी महाराजांनंतर आता राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांनी देखील केंद्र सरकार कृषीविषयक कायदे पुन्हा लागू करू शकते. असं विधान केले आहे.

कलराज मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे रद्द करण्याची जी घोषणा केली होती. ती घोषणा सकारात्मक दिशेने टाकलेले पाऊल आहे. हे कायदे करण्यासाठी ही वेळ अनुकूल नाही, त्यामुळे हे विधेयक पुन्हा येऊ शकते. असं विधान कलराज मिश्रा यांनी केलं आहे.

Tags:    

Similar News