''महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही'' राज्यपालांचा राज ठाकरेंनी घेतला समाचार

Update: 2022-11-27 15:59 GMT

छत्रपती शिवाजी महाराजांवर वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्यपाल भगतशिंग कोशारी त्यांची नक्कल करून चांगलाच समाचार घेतला

तुमचं वय काय, बोलता काय ? चाललंय काय ..राज्यपाल पदावर बसला आहात म्हणून मान राखतो , महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही असा दम राज ठाकरेंनी राज्यपालांना दिला, मारवाडी , गुजराती महाराष्ट्रातून गेले तर काय होईल असं वक्तव्यही गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी केलं होतं ह्या वक्तव्याचा समाचारही राज ठाकरेंनी घेतला.तुम्ही व्यापारी,उद्योजक आहेत तर तुमच्या राज्यात का नाही व्यापार केला , महाराष्ट्राची भूमी सुपीक आहे हे कोशारींनी सांगण्याची गरज नाही, परदेशातून कोणताही उद्योग यायचा असेल तर पहिली पसंती महाराष्ट्रच असतो. मुंबईतील नेस्को सेंटर मध्ये मनसे कार्यकर्त्यांचा आगामी निवडणुकीसाठी मेळावा घेण्यात आला यावेळी राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांवर हात घातला.


Tags:    

Similar News