विधानपरिषदेसाठी प्रज्ञा सातव बिनविरोध; भाजपच्या संजय केणेकरांची शेवटच्या क्षणी माघार

Update: 2021-11-22 07:42 GMT

कोविड काळात दिवंगत झालेले कॉंग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. कॉंग्रेसच्या शिष्ठाईनंतर भाजप उमेदवार संजय केणेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. संजय केणेकरांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रज्ञा सातव यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड होणार आहे.

यापूर्वीही रजनी पाटील यांच्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने उमेदवार माघे घेतला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवड बिनविरोध करण्याची विनंती केली होती. भाजपने आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर विधानपरिषदेची ही पोटनिवडणूक होत आहे.

कॉंग्रेसचे दिवंगत विधान परिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या जागेवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली होती. खरतर राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी प्रज्ञा सांवत यांचा विचार होईल, अशी चर्चा होती.

परंतु कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी रजनी पाटील यांना उमेदवारी दिली. प्रज्ञा यांना राजीव सातव यांच्या हिंगोली किंवा कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून २०२४ मध्येच उमेदवारी दिली जाईल असे बोलले जात होते. मात्र शरद रणपिसे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठीच प्रज्ञा सातव यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींनी पसंती दर्शवली. विधानपरीषदेची पोटनिवडणुक आता बिनविरोध होत असल्यानं प्रज्ञा सातव विधानपरीषदेच्या सदस्य होण्याची फक्त औपचारीकता शिल्लक राहीली आहे.

Tags:    

Similar News