पेगासस प्रकरण: फ्रान्स, इस्राइल ने दिले चौकशीचे आदेश, मोदी सरकार कधी चौकशी करणार?

Update: 2021-07-23 06:26 GMT

पेगासस प्रकरणात आता फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा सुद्धा समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी २४ तासांच्या आतच चौकशीचे आदेश दिले आहेत. फ्रेंच टीव्ही चॅनेल टीएफ १ च्या पंतप्रधान जीन कॅस्टॉक्सच्या विधानाचा संदर्भ देत रॉयटर्सने बुधवारी हे वृत्त दिले आहे.

मॅक्रॉन यांच्या कार्यालयाने या संदर्भात माहिती दिली आहे.

"जर ही तथ्य खरी असतील, तर नक्कीच हे खूप गंभीर आहे."

माध्यमांनी दिलेल्या वृत्ताचा पूर्णपणे शोध घेतला जाईल. काही फ्रान्समधील नागरिकांनी यापूर्वीच या संदर्भात तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यामुळे कायदेशीर तपास लगेचच सुरू केला जाईल.

दरम्यान पेगासस प्रकरणातील ज्या व्यक्तींचे फोन टॅप करण्यात आले होते. त्यापैकी ३७ लोकांच्या फोनची फॉरेन्सिक चाचणी केली असता त्या व्यक्तीच्या फोनमध्ये पेगासस हल्ल्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी १० जण हे भारतीय आहेत. यामध्ये ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांच्यासह पत्रकार सुशांत सिंह आणि द वायरचे दोन संस्थापक संपादकांचा समावेश आहे.

पेगासेस प्रकरणात ४० हून अधिक पत्रकार, विरोधी पक्षातील तीन नेते, नरेंद्र मोदी सरकारमधील दोन विद्यमान मंत्री, सुरक्षा संस्थांचे सध्याचे आणि माजी प्रमुख अधिकारी आणि मोठ्या संख्येने व्यावसायिकांची नावे समाविष्ट आहेत.

मात्र, फ्रान्समध्ये हे प्रकरण समोर येताच चौकशीचे आदेश दिले आहेत. भारतात मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सरकारने कोणाचीही हेरगिरी केली नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, अद्यापपर्यंत या प्रकरणाच्या चौकशी चे कोणतेही आदेश दिलेले नाहीत.

तर दुसरीकडे, एनएसओ समूहाचा देश असलेल्या इज्राइल सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ मंत्र्यांची टीम तयार केली आहे.

Tags:    

Similar News