पंकजा मुंडे भडकल्या, रस्त्यावरच कार्यकर्त्यांची झाडाझडती

Update: 2021-08-16 10:10 GMT

प्रितम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपद न मिळाल्याने नाराज कार्यकर्त्यांची समजूत घालणाऱ्या पंकजा मुंडे सगळ्यांनी पाहिल्या. पण सोमवारी गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांचा वेगळाच अवतार कार्यकर्त्यांनी अनुभवला.... केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरूवात परळीच्या गोपीनाथ गडावरुन झाली आहे. गोपीनाथ गडावर नतमस्तक होऊन कराड यांची यात्रा गंगाखेड मार्गे नांदेडकडे रवाना झाली. यावेळी पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. पण या यात्रेमध्ये सहभागी झालेल्या पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी "पंकजा मुंडे अंगार है बाकी सब भंगार है," अशा घोषणाबाजी केली. यामुळे पंकजा मुंडे प्रचंड संतापल्या. त्यांनी रस्त्यावरच त्या सर्व कार्यकर्त्यांना गाठले आणि त्यांना कडक शब्दात समज दिली.





 

केंद्रीय मंत्रिमंडळात प्रितम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे समर्थकांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले होते. पण त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी पंकजा मुंडे यांना बोलावून कार्यकर्त्यांची समजूत घालण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना समजावून राजीनामे मागे घेण्यास भाग पाडले होते. पण जनआशीर्वाद यात्रेत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पक्षांतर्गत मतभेद असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे संतापलेल्या पंकजा मुंडे यांनी या कार्यकर्त्यांची खरडपट्टी काढली...आपल्याच पक्षाच्या कार्यक्रमात भंगार है वैगरे घोषणा कशा दिल्या जाऊ शकतात, असा सवालही त्यांनी विचारला.पंकजा मुंडे भडकल्या, रस्त्यावरच कार्यकर्त्यांची झाडाझडती

Tags:    

Similar News