राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, नितेश राणे यांची मागणी

Update: 2021-08-25 11:42 GMT

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा केल्यानंतर त्यांना अटक झाली. त्याआधी मंगळवारी दिवसभर शिवसैनिकांनी ठिकठिकाणी आंदोलनं केली. यावेळी मुंबईत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या जुहू इथल्या बंगल्याबाहेर जोरदार निदर्शनं केली. इथे भाजप कार्यतकर्तेही असल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमकपणे आंदोलन केले. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना तिथून हटवले. या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या कोअर कमिटीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली.

"युवासेना कोअर कमिटीने आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख, मंत्री @AUThackeray जी यांची भेट घेतली." असे ट्विट वरुण सरदेसाई यांनी केले आहे.




वरुण सरदेसाई यांच्या या ट्विटवरुन नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. "प.बंगालप्रमाणे राज्य सरकार पुरस्कृत हिंसाचार होता, हे आता सिद्ध झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुरक्षेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे पण ते तर गुंडांना शाबासकी देत आहेत. ही आहे महाराष्ट्रातील परिस्थिती...या गुंडांपासून महाराष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट हाच एकमेव उपाय आहे."

अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.


Tags:    

Similar News