आता त्या १२ तोंडांनी काय उत्तर द्याल? किशोरी पेडणेकर यांचा भाजपला सवाल

Update: 2022-09-10 10:33 GMT

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत बैठक झाली असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे. भाजपच्या या आरोपाल किशोरी पेडणेकर यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. पेडणेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचे रऊफ मेमनचे फोटो दाखवून भाजपला काही सवाल केले आहेत. आता फडणवीस आणि कोश्यारी यांच्या चौकशीचीही मागणी करणार का? असा प्रश्न किशोरी पेडणेकरांनी भाजप नेत्यांना विचारलाय.

"बडा कब्रस्तानच्या समोर पाणी भरलं असल्याने मी तिथे गेले होते. मी बडा कब्रस्तानमध्ये गेले असल्याचं नाकारलंच नाही. पण मी महापौर असताना माझ्या नेत्याने सांगितल्याने तिथे गेले होते. बैठकीला कोण कोण होते, याची मला कल्पना नाही. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्त्रींवर आरोप करुन भाजपला काय मिळतं. आम्हाला सातत्याने टार्गेट करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे", असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी भाजपने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.


Full View

Tags:    

Similar News