Congress President : मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे विरुध्द शशी थरुर यांच्यात झालेल्या लढतीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले.

Update: 2022-10-19 08:56 GMT

Congress President : शशी थरूर (Shashi Tharoor)आणि मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्यात झालेल्या लढतीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी झाले आहेत. त्यामुळे तब्बल 24 वर्षानंतर काँग्रेस पक्षाला गांधी घराण्याबाहेरचे व्यक्ती अध्यक्षपदी मिळाले आहेत.

सोमवारी काँग्रेस अध्यक्ष पदासाठी देशभरातील 9500 काँग्रेस सदस्यांनी मतदान केले. याची मतमोजणी नुकतीच पुर्ण झाली असून मल्लिकार्जुन खर्गे यांना 7 हजार 897 मतं मिळाले. तसेच शशी थरूर यांना 1 हजार 72 मतं मिळाले. त्यामुळे काँग्रेसच्या निडणूक समितीने मल्लिकार्जुन खर्गे यांना विजयी घोषित केले. त्यामुळे तब्बल 24 वर्षानंतर प्रथमच काँग्रेसला गांधी कुटूंबाबाहेरचे व्यक्ती अध्यक्ष म्हणून मिळाले आहेत.

गांधी घराण्याबाहेरचे काँग्रेस अध्यक्ष (Congress President outside of Gandhi-Neharu family)

  • काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप केला जातो. मात्र गांधी-नेहरू घराण्याव्यतिरीक्तही काही काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.
  • भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 मध्ये भोगाराजू पट्टभी सितारामय्या यांची काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
  • 1950 मध्ये स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे दुसरे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन हे होते.
  • 1951 ते 1955 मध्ये पंडित नेहरु अध्यक्ष होते. त्यानंतर यु एन ढेबर हे 1959 पर्यंत अध्यक्ष होते.
  • 1959 मध्ये काही काळापुरत्या इंदिरा गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्यानंतर 1960 ते 63 या काळात नीलम संजीव रेड्डी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
  • 1964 ते 1967 या काळात दक्षिणेतील के. कामराज हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
  • 1968-70 या कालावधीत एस निजलिंगप्पा हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
  • 1970 ते 72 या कालावधीत जगजीवनराम हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
  • 1972 ते 1975 या कालावधीत जगजीवनराम हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
  • 1972-75 या कालावधीत शंकर दयाळ शर्मा हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
  • 1975-77 या कालावधीत देवकांता बरुओ हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
  • 1977 ते 78 या कालावधीत कासू ब्रम्हानंद रेड्डी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
  • 1978 ते 91 या दरम्यान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी काँग्रेसचे अध्यक्ष होते. मात्र त्यानंतर 1992 ते 1996 या कालावधीत पी नरसिंह राव हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
  • 1996 ते 1998 सिताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते.
  • 1998 ते 2022 पर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी अध्यक्ष होते. मात्र आता मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत.

Tags:    

Similar News