उदय सामंत : राज्यसभा निवडणुकीत मित्रपक्षांनी सेनेला दगा दिला

Update: 2022-06-28 08:17 GMT

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतरही चार दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले मंत्री उदय सामंत यांनी गुवाहाटी गाठल्याने खळबळ उडाली. मंत्रीपद देऊनही सामंत यांनी बंड का केले, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. यावर उदय सामंत यांनी गुवाहाटीवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे,

आपण आजही शिवसेनेतच असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे, त्याला कंटाळून आपण गुवाहाटी येथे आलो असल्याचे त्यांनी सांगितले आहे. "राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले" असा आरोप त्यांनी केला आहे.

"त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये" असे आवाहन त्यांनी केले आहे.

Full View

Tags:    

Similar News