Eknath Shinde माध्यमांसमोर, आमदार फुटल्याच्या दाव्याला उत्तर

Update: 2022-06-28 08:33 GMT

शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गुवाहाटीमध्ये (Guwahati) गेल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांना थेट बाहेर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) संजय राऊत (Sanjay Raut), अनिल देसाई (Anil Desai) यांनी बंडखोर आमदारांपैकी २० आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ते राहत असलेल्या रेडिसन ब्लू (Radisson Blu) हॉटेलच्या बाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला.

आपल्यासोबत आलेले ५० आमदार हे स्वत:च्या मर्जीने आले आहेत, त्यांना कुणीही जबरदस्तीने आणलेले नाही, ते सर्व खूश आहेत, असा दावा त्यांनी केला. २० आमदार संपर्कात असल्याचा दावा बाहेरुन करण्यात येतो आहे. जे आमदार संपर्कात आहेत, त्यांची नावे शिवसेनेच्या नेत्यांनी द्यावी म्हणजे सत्य काय आहे ते समोर येईल, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व हेच आमचे हिंदुत्व आहे, आम्ही शिवसेनेतच आहोत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

याच संवाद दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुंबईला कधी परतणार असे पत्रकारांनी विचारले असता, याबाबतच कोणताही निर्णय़ अद्याज झालेला नाही. पण याबाबतची सर्व माहिती दीपक केसरकर देतील असेही त्यांनी सांगितले. बंडखोर आमदारांची एक महत्त्वाची बैठक त्या हॉटेलमध्ये होणार आहे. त्या बैठकीआधी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. पण यापुढची रणनीती काय असेल, आपले पुढचे पाऊल कसे असेल याबाबतची माहितीही लवकरच दिली जाईल अशीही माहिती त्यांनी पत्रकारांना दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीमध्ये दाखल झाल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. शिवसेनेचे सर्व दावे खोडुन काढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्यासोबत ५० आमदार असल्याची माहितीसुद्दा त्यांनी दिली.

Tags:    

Similar News