औरंगाबाद, उस्मानाबादपाठोपाठ पुणे शहराचेही नाव बदला, काँग्रेसची मागणी

राज्यात सत्तानाट्याचा महाअंक सुरू आहे. त्यातच मंत्रीमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने उस्मानाबादचे नाव धाराशिव तर औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यापाठोपाठ आता पुणे शहराचेही नाव बदलण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

Update: 2022-06-29 13:45 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार अडचणीत आहे. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बहूमताची चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान ठाकरे सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णयांचा धडाका लावला आहे. त्यातच उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव तर औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे. त्यातच आता काँग्रेसने पुणे शहराचे नाव बदलून जिजाऊनगर करण्याची मागणी केली आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद पाठोपाठ पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर काँग्रेसने पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. याआधीही पुणे शहराचे नाव बदलून जिजापूर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली होती. तर आता काँग्रेनेही पुणे शहराचे नाव बदलून जिजाऊनगर करा, अशी मागणी केली आहे.


Tags:    

Similar News