सत्ताधाऱ्यांनी फक्त स्वतःच्या बापाची थडगी बांधण्याचे काम केले- गोपिचंद पडळकर यांचा हल्लाबोल

राज्यात सत्तांतरानंतर गोपिचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एका कार्यक्रमानिमीत्त सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे एकत्र आले होते. यावेळी गोपिचंद पडळकर यांनी हल्लाबोल केला.

Update: 2022-07-11 13:47 GMT

राज्यात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर प्रथमच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप नेते गोपिचंद पडळकर एका कार्यक्रमानिमीत्त एकत्र आले होते. यावेळी बोलताना गोपिचंद पडळकर यांनी ज्यांच्या हाती सत्ता दिली. त्यांनी शासकीय पैशातून फक्त स्वतःच्या बापाची थडगी बांधण्याचे काम केले, असे वक्तव्य केले आहे.

गोपिचंद पडळकर म्हणाले, आत्तापर्यंत जी लोकं सत्तेत बसली होती. त्यांनी प्रतिभावंत, साहित्यिक आणि समाजसुधारकांची स्मारक बनवली नाहीत. मात्र आपल्या बापांची 'थडगी' बांधण्यासाठी शासनाचे करोडो रुपये खर्च केले. तर ती थडगी बांधून ती स्मारक म्हणून जाहीर केली, अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

पुढे बोलताना गोपिचंद पडळकर म्हणाले की, ज्यावेळी राजकारणी हे महामानव, समाजसुधारक आणि साहित्यिकांना फक्त भाषण आणि पुरस्कारा पुरते मर्यादित ठेवतात. त्यावेळी समाजाचा विकास कधीच होत नाही. त्यामुळे राजकारण्यांनी साहित्यिक, समाजसुधारक आणि महामानवांचा सन्मान करायला हवा, असं मत व्यक्त केले.

मात्र गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे होता, असा सवाल या भाषणानंतर चर्चेला जात आहे. भाजपकडून शिवसेनेवर टीका करताना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतले जाते. मात्र माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधले. त्यावरून गोपिचंद पडळकर यांचा रोख उध्दव ठाकरे यांच्या दिशेने होता का? अशीही चर्चा रंगली आहे.

Tags:    

Similar News