राज्यपालांना कोल्हापूरी जोडे दाखवण्याची गरज, उद्धव ठाकरेंचा टोला

Update: 2022-07-30 08:21 GMT

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. हे त्यांच्या ओठातून आले आहे का पोटातून आले आहे हा संशोधनाचा विषय, पण दिल्लीत बसणाऱ्यांचा जीव मुंबईत आहे हे राज्यपालांनी आपल्या विधानातून स्पष्ट केले आहे, येणाऱ्या काळात निवडणुकीत मतांचे ध्रुवीकरण करण्याचा विधानाचा हेतू असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. आमच्याकडे सोबत अमराठी आहेत, त्यांचे संस्कार ते पाळतात. पण राज्यपालांनी फुट पाडल्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.

राज्यपाल पद मानाचे आहे पण त्या खुर्चीत बसणाऱ्या व्यक्तीने त्याचा आदर ठेवलेला नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. "मी मुख्यमंत्री असतांना लॉकडाऊनच्या काळात राज्यपालांनी सर्व धर्मीय प्रार्थना स्थळं उघडण्याचा आग्रह केला, सावित्रीबाई फुलेंबाबत हिणकस वक्तव्य केले, आता पुन्हा आपत्तीजनक वक्तव्य त्यांनी केले आहे" असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना सल्ला देखील दिला आहे.

"राज्यपालांनी महाराष्ट्रात अनेक चांगल्या गोष्टी बघितल्या असतील. महाराष्ट्रात खूप काही बघण्यासारख आहे, "महाराष्ट्र का घी देखा लेकिन कोल्हापूर का जोडा नही देखा" असे म्हणायची वेळ आली आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. "त्यांना कोल्हापूरच्या वाहणा दाखवणे गरजेचे, त्याचा उपयोग कसा करायचा हे ठरवावे लागेल" असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राची ओळख जगाला आहे पण राज्यपालांना नाही याची खंत, वाटते असे म्हणत मुंबई ही हक्काने मिळवली आहे कोश्यारींनी आंदण दिलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. राज्यपालांनी शपथ घेतांना जाती पाती एकत्र ठेवायची शपथ घेतली आहे, पण राज्यपालांनी हिंदूंमध्ये फुट पाडणे, जातीपाती- धर्मावरुन आग लावणे, असे प्रकार केले असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

गेली तीन वर्ष महाराष्ट्राचे मीठ खाल्ले त्याच्याशी नमक हरामी केली अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील टोला लगावला आहे. नवहिंदूंनाही आता राज्यपालांच्या वक्तव्याबाबच भूमिकेची विचारणा केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तक राज्यपालांना तात्काळ परत पाठवले पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राची माफी मागायला हवी, आग लावू नये असेही त्यांनी म्हटले आहे..


Full View

Tags:    

Similar News