सत्तानाट्यात देवेंद्र फडणवीस यांचे डिमोशन, उपमुख्यमंत्रीपदी विराजमान

गेल्या दहा दिवसांपासून राज्यात सत्तानाट्य सुरू होते. मात्र या सत्तानाट्याला अखेर पुर्णविराम लागला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे डिमोशन झाले आहे.;

Update: 2022-06-30 14:40 GMT

राज्यातील सत्यानाट्याचा अंतिम अंक उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याने होईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, असाच ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत होता. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीच्या काही मिनिट आधी देवेंद्र फडणवीस यांना अमित शहा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे आदेश दिले आणि फडणवीस यांना नाईलाजाने सरकारमध्ये सहभागी व्हावे लागले आहे.

राजभवनमध्ये झालेल्या छोटेखानी शपथ समारंभात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण देवेंद्र फडणवीस यांची बॉडी लँग्वेज मात्र अत्यंत निराशाजनक स्वरूपाची दिसून आली. कारण या शपथविधी आधी भाजपमध्ये काही मिनिटातच खूप मोठ्या घडामोडी घडल्याचं दिसून येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे हे मुख्यमंत्री होतील पण आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असा मोठा धक्का राज्यातल्या जनतेला दिला. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी बसवणं हे भाजपचे ध्येय होतं असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर एकटे शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशाप्रकारे राजभवनात तयारी सुरू झाली. पण शपथविधीच्या काही मिनिट आधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावं, असा निर्णय पक्षाने घेतला आहे अशी भूमिका मांडली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून नड्डा यांची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली असल्याचं ट्विटरवरून जाहीर केलं.

Full View

यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून आपण पक्षाचे प्रामाणिक कार्यकर्ते असल्याने पक्षाचा आदेश हा मान्य करणे हे आपले कर्तव्य आहे, त्यामुळे तो मानून आपण सरकारमध्ये सहभागी होत असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

Full View

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्या आहेत. 

Full View

देवेंद्र फडणवीस यांनी याआधी दोन वेळा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्रीपदी त्यांना विराजमान व्हावे लागल्याने त्यांचे डिमोशन झाला आहे का अशीही चर्चा सुरू झाली आहे.

Tags:    

Similar News