एकनाथ शिंदे यांचा भाजपने केसाने गळा कापलाय का? काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा सवाल

एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मंत्रीमंडळ विस्तार करण्याऐवजी मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे.

Update: 2022-08-06 06:51 GMT

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करून एक महिना उलटून गेला. मात्र त्यानंतरही मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला नाही. तर शिंदे-फडणवीस सरकारने मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिले आहेत. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोँढे यांनी सरकारवर टीकास्र सोडले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मंत्रीमंडळ विस्तार करण्याऐवजी मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी टीका केली आहे.


अतुल लोंढे म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सचिवालयाचे नाव बदलून लोकाभिमुख कारभार चालावा यासाठी मंत्रालय असे केले. त्यामध्ये प्रशासनाने सरकार चालवण्याऐवजी ते लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी चालवणे अपेक्षित असल्याचे म्हचटले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी पुन्हा नोकरशाहीच्या हाती महाराष्ट्र दिला आहे. हे योग्य नसल्याची टीका अतुल लोंढे यांनी केली.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी हे उपमुख्यमंत्री पदी बसून राज्याचे सर्व निर्णय घेत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मम म्हणण्याचे काम करीत आहेत. त्याबरोबरच शिवसेना फोडून भाजपने एकनाथ शिंदे यांचा केसाने गळा कापला आहे का? याचा एकनाथ शिंदे यांनी विचार करावा, असंही अतुल लोंढे म्हणाले.

Tags:    

Similar News