'घटनात्मक चौकटीत राहून आम्ही नियमात बदल केला आहे' - महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

Update: 2021-12-29 11:16 GMT

अहमदनगर : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष अवघ्या राज्याने पहिला दरम्यान सरकारवतीने राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या पत्रावरून

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली होती, याबाबत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरत यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, राज्यपालांना कोणते शब्द आवडले ना आवडले मला माहित नाही. राज्यपाल आणि सरकार यांच्यात विचारांचे मतभेद आहेत. मात्र, आम्ही जो नियमांमध्ये बदल केलाय तो योग्य केलाय , घटनात्मक चौकटीत राहून हा बदल केला आहे. ज्या पद्धतीने लोकसभेत अध्यक्षाची निवड होते त्याच पद्धतीने आम्ही विधानसभेत निवड करत होतो. ज्या पद्धतीने पंतप्रधान राष्ट्रपतींना शिफरस करतात तशीच शिफारस मुख्यमंत्री राज्यपालांकडे केली.सोबतच आम्ही राज्यपालांचा मान राखण्यासाठी थांबलो त्यांचा सन्मान आम्ही राखला असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहिले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्या पत्राला उत्तर दिले आहे. या पत्रात राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्रातील भाषेवर नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर झाला होता. हा प्रस्तावाला मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता.

दरम्यान मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाठवलेल्या पत्रातील स्वर राज्यपालांच्या सर्वोच्च घटनात्मक कार्यालयाची अवहेलना आणि अवमान करणारा असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले आहे. तुमच्या पत्राचा असंयमी स्वर आणि धमकीवजा शब्द पाहून मी वैयक्तिकरित्या दुःखी आणि निराश झालो. असं राज्यपालांनी म्हटलं आहे. यावर महसूलमंत्री थोरात यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी 'मला माहिती नाही की नेमकी राज्यपालांना पत्रातील कोणते शब्द आवडले नाही' असं उत्तर दिलं आहे. ऐकूनच विधानसभा अध्यक्ष निवडण्याच्या नियमातील बदलावरून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

Tags:    

Similar News