आम्हीतर पक्के खोकेवाले आहोत, खोके घेतले, काय बोलायचं- एकनाथ शिंदे

Update: 2023-02-17 06:56 GMT

सात महिन्यापूर्वी राज्यात सत्तांतर झाले आणि अनेकांच्या पोटात पोटशूळ उठला. त्यांच्या तोंडी आता दोन शब्द शिल्लक राहिले आहे. खोके...खोके...याच्यापुढे विरोधकांकडे बोलायला काहीच उरलेले नाही. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

सात महिन्यांपूर्वी राज्यात मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बंड केले आणि राज्याच्या राजकारणात एकच वादळ उठले. या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपाने राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून शिंदे गटातील आमदारांवर विरोधकांनी खोके घेतल्याचा आरोप करण्यास सुरवात केली, तो आजही सुरु आहे. मात्र याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. आम्हीतर पक्के खोकेवाले आहोत, खोके घेतले, काय बोलायचं ते बोला, पण ते खोके आम्ही घरात जमा केले नाहीत, असा टोला शिंदे यांनी विरोधकांना लगावला. ते जळगावात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

विरोधकांचे काम आहे सत्ताधाऱ्यांवर आरोप करणे, ते आरोप करत असतात, विरोधकांकडे आता फक्त दोनचं शब्द शिल्लक राहिले आहेत. तिसरा शब्दच विरोधकांना सुचत नाही. जळगावचे आमदार गुलाबराव पाटलांना सरकारच्या वतीने २७० खोके दिले. चिमणआबाला १११५ खोके दिले. खोके घेतले पण ते घरात जमा केले नाही, आम्ही ते जनतेच्या कामासाठी दिले. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. सात महिन्यांपूर्वी जो उठाव केला, तो जनतेच्या काम आणि भगव्यासाठी केला. भुंकणारे भुंकू द्या. लोक आमच्यावर खूर टिका करतात. पाच-पंधराजण खोके-खोके- खोके बोंबलत आहे. त्यांच्या बोंबलण्यामुळे सरकारला काहीही धक्का बसणार नसल्याचे शिंदे यावेळी म्हणाले. आज मतदारसंघात ३७० खोके दिले. राष्ट्रवादीवाल्यांना सांगा, असे शिंदेंनी ठणकावून सांगितले. आम्ही कामाने विरोधकांना उत्तर देणार असल्याचे शिंदेंनी सांगितले. कोणत्याही मतदारसंघात चौफेर रोड आणि पाण्याच्या कामाची कामे सुरु आहेत. याच्यासाठी आम्ही उठाव केला. जो-जो आडवा येईल, त्याचा सत्यानाश होवो, असा हल्लाबोल मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर केला.

Tags:    

Similar News