भाजपकडून ईडीचा गैरवापर होतोय : राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

Update: 2021-07-12 04:04 GMT

केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे बाहुल्या नाहीत. आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना संपविण्याकरिता ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करणे चुकीचे आहे. ज्यांनी प्रत्यक्षात गुन्हे केलेत ते मोकाट सुटलेत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप वर तोफ डागली आहे.

मनसेच नूतन शहर कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राजकारणात काय खिचडी शिजत आहे. जनतेची दिशाभूल कशा पध्दतीने कली जाते. त्यावर भाष्य केल आहे. काँग्रेस सत्ता काळात ईडीचा गैरवापर झालेला आहे. भाजपकडूनही आत्ता गैरवापर केला जात आहे. तपास यंत्रणा म्हणजे बाहुल्या नाहीत. आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना संपविण्याकरिता ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करणे चुकीचे आहे. ज्यांनी प्रत्यक्षात गुन्हे केलेत ते मोकाट सुटलेत, अशा शब्दात ठाकरे यांनी भाजप आणि काँग्रेस पक्षावर तोफ झाडली. . तर मराठा आणि ओबीसी समाजाचे आरक्षण सर्वच राजकीय पक्षांना मान्य आहे. तर, मग अडलेय कुठे? आरक्षण का मिळत नाही. राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवित आहेत, यांना आरक्षणाच्या मुद्यावरून तरुणांची डोकी भडकवायची असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.

ओबीसी समाजाला राजकिय आरक्षण देण्याबाबतही एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. न्यायालयामध्ये बाजू का मांडली जात नाही. या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर बोलावून समाजाने विचारणा करायला हवी. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी मोर्चा निघाला होता. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप अशा सर्वच पक्षांचे नेते सामोरे गेले होते. सर्वांनी त्यावेळी आरक्षणाचा मुद्दा मान्य केला होता. आजही तोच सूर आळवला जात आहे.आरक्षणाबाबत बातम्यांमधून आणि चर्चामधून समोर येणारी माहिती वरवरची असल्याचेही ते म्हणाले. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र हेच समजेनासे झाले अशी टिका ठाकरे यांनी केली .

येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्यातील पालिकांच्या निवडणुका आहेत. पुढे ढकलल्य निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणासोबत जायचे ते नियोजन करु असे ते म्हणाले.

खडसेंची सीडी' कुठे?

खडसेंवर कारवाई झाली तरी त्यांची. सीडी बाहेर आलेली नाही. तुमच्याकडे ईडी असेल तर मी सीडी लावीन असे खडसे म्हणाले होते. त्यांच्या 'सीडीची मी वाट पाहत असल्याचे ठाकरे म्हणाले

येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये राज्यातील पालिकांच्या निवडणुका आहेत. पुढे ढकलल्या जात आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणासोबत जायचे ते नियोजन करू. यावेळी शहरप्रमुख वसंत मोरे, अनिल शिदोरे, नेते बाब वायस्कर महिला अध्यक्षा पाटील-ठोंबरे, पालिकेतील गटनेते साईनाथ बाबर, गणेश सातपुते आदी उपस्थित होते.

Tags:    

Similar News