आदित्य ठाकरे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा?

Update: 2022-06-22 06:46 GMT

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. ठाकरे सरकारचा प्रवास बरखास्तीच्या दिशेने चालल्याची चर्चा असताना आदित्य ठाकरे यांच्या एका कृतीमुळे हा चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन पर्यावरण मंत्री हे पद हटवले आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा झाला का, अशीही चर्चा सुरू झाली आहे.


 



एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांनी बंड केले आहे. हे सर्व आमदार आधी गुजरातमधील सुरत आणि आता आसाममध्ये गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे गटनेते बहुमत असल्याने आपणच गटनेते आहोत, असा दावा केला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याह इतर आमदारांच्या नाराजीचे कारण आदित्य ठाकरे यांचे पक्षातील वाढते वजन आणि इतरांच्या कामातील हस्तक्षेप असल्याचे देखील सांगतिले जाते आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी आधीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते आहे. तसेच ट्विटर हँडलवरुन आपले पद काढून टाकले आहे.

Full View

Tags:    

Similar News