विदर्भ खान्देश मराठावाड्यात दोन दिवस जोरदार पाऊस
Heavy rains for two days in Vidarbha, Khandesh and Marathawada
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा फटका पुन्हा राज्याला बसणार आहे. 4 ते 5 नोव्हेंबर म्हणजे मंगळवार, बुधवारीही खान्देश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहॆ. त्यानंतर दोन दिवस कोकण पट्ट्यात पाऊस होईल. आणि ७ नोव्हेंबरनंतर राज्यात थंडी सुरू होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.
ह्या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचे चटके कमी जाणवले आणि मे मध्येच महाराष्ट्रात आलेला पाऊस हटण्याचे आजही नाव घेत नाही. परतीच्या मान्सूनने राज्यातून काढता पाय घेतला असला तरी प्रत्यक्षात पाऊस कोसळतच आहे. आधीच मोंथा चक्रीवादळाने तडाखा राज्याला दिला आहे.