राष्ट्रवादीचे भीक मागो आंदोलन

Update: 2019-06-25 09:17 GMT

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मुंबईत भीक मागो आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सीएसएमटी स्थानकासमोर भीक मागून आंदोलन करत काही जमवली रक्कम जमा केली. मुंबई महापालिकेने मुख्यमंत्र्यांसहीत अनेक मंत्र्यांच्या बंगल्याची पाणीपट्टी थकवली असल्याने डिफॉल्टर ठरवले आहे. जमा झालेली रक्कम मुखमंत्र्यांना देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यासहीत अनेक मंत्र्यांच्या करोडो रुपयांची पाणीपट्टी थकली असल्याचा मुद्दा पकडत आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सीएसएमटीसमोर भीक मागो आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसहीत हे आंदोलन केले.

सीएसएमटीसमोर खाली बसून मुख्यमंत्र्यांची पाणीपट्टी भरण्यासाठी भीक मागत असल्याचे लोकांना सांगितले. त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे पैसे देवू केले. ही रक्कम मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले.

Similar News