सावधान! व्हिडीओ कॉलिंगसाठी ZOOM APP वापरताय? तर ही बातमी तुमच्यासाठी

Update: 2020-04-16 19:27 GMT

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊनची स्थिती आहे. त्यामुळे बहुतांश संस्थांमध्ये 'वर्क फ्रॉम होम' सुरू आहे. घरबसल्या काम करताना व्हिडीओ कॉलिंग आणि व्हिडीओ कॉन्फरन्ससिंगसाठी ZOOM App जगभरात लोकप्रिय होत आहे. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयाने हे अँप सुरक्षित नसल्याचं म्हटलंय. ZOOM App वापरण्याबद्दल राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीने काही मार्गदर्शक तत्वेही जारी केली आहेत.

अनेक संस्था ZOOM App चा वापर कार्यालयीन कामांसाठी करत आहेत. या माध्यमातून अनेक शाळा-महाविद्यालयांच्या ऑनलाइन तासिका होत आहेत. मात्र, या App च्या वापरामुळे सायबर हल्ल्याचा धोका आहे. या App च्या कमकुवत सुरक्षा मानकांचा वापर करून हॅकर युझरच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमधील डेटा लीक करू शकतो किंवा सिस्टीम हॅक करू शकतो असं 'कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम' आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीकडून सांगण्यात आलंय.

त्यामुळे या ZOOM App चा वापर करायचा असेल तर App Up-to-date ठेवणं गरजेचं आहे. याचा पासवर्डही कठीण असावा. याशिवाय प्रत्येक वापरावेळी पासवर्ड बदलत राहावं असं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

https://twitter.com/PIBHomeAffairs/status/1250744895901323264?s=19

 

Similar News