#BMC_ELECTION योगी आदित्याथ उघडणार उत्तर भारतीयांसाठी मुंबईत स्वतंत्र कार्यालय

Update: 2022-05-10 07:52 GMT

 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांसाठी मोठी घोषणा केली आहे.मुंबईत जवळपास ५० ते ६० लाख उत्तर भारतीय नागरिक राहतात.त्यांच्या नोकरी आणि व्यवसायासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी मुंबईतच उत्तरप्रदेश सरकारचं कार्यालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती योगी सरकारकडून देण्यात आली आहे.

येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जातयं. मुंबईत ३० ते ४० टक्के उत्तर भारतीय वास्तव्यास आहे.मुंबई महानगरपालिकेच्या (BMC)निवडणूकीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.योगी सरकारच्या या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबईत लवकरच उत्तरप्रदेश सरकारचं कार्यालय उभारलं जाणार असून याठिकाणी उत्तर भारतीय नागरिकांचे नोकरी तसेच व्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत यामाध्यमातून केली जाणार आहे.अशी घोषणा योगी सरकारकडून केली आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर महाराष्ट्रात आता राजकीय पडसाद उमटण्य़ाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याच निर्णयावर कॉंग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे.कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करुन भाजपा सरकारवर टिका केली आहे.ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी योगी सरकारवर टिका केली आहे.

एकीकडे राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्या परप्रांतीय विरोधी भूमिकेमुळे त्यांना उत्तर प्रदेशात होणारा विरोध वाढत असतानाच योगी सरकारच्या या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

दरम्यान उत्तरप्रदेशात (UP)महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध होत आहे.काही वर्षांपासून राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती.त्याचेच पडसाद आता उत्तर प्रदेशात उमटू लागले आहेत.भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी शक्तीप्रदर्शन करत राज ठाकरेंना कुठल्याही परिस्थितीत अयोध्येत पाऊल ठेवून देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने उत्तर प्रदेशात रॅली काढण्यात आली आहे.जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही तोवर त्यांना उत्तर प्रदेशात येऊ देणार नाही, असा इशारा खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे.

Tags:    

Similar News