दहशतवाद्यांना निधी पुरवठा केल्याप्रकरणी यासीन मलिकला जन्मठेप, जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेटबंदी

दिल्लीच्या NIA च्या विशेष न्यायालायने दहशतवाद्यांना फंडिंग केल्याप्रकरणी यासीन मलिकला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

Update: 2022-05-26 05:03 GMT

दिल्लीच्या NIA कोर्टाने यासीन मलिकला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच न्यायालयाने निकाल जाहीर करताना 10 लाख रुपयांचा दंड आण जन्मठेप ठोठावली आहे.

काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे जमा करून दहशतवाद्यांना पुरवले असल्याचे न्यायालयाने मान्य केले. त्यामुळे न्यायालयाने यासिन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी NIA ने केली होती. मात्र न्यायालयाने यासिन मलिकच्या या कृत्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

NIA ने 30 मे 2017 रोजी या यासिन मलिक विरोधात दहशतवादी कृत्यांना रसद पुरवल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर अखेर या प्रकरणावर NIA कोर्टाने निकाल दिला आहे. त्यामध्ये यासिन मलिकला जन्मठेप आणि दहा लाख रुपयांची शिक्षा सुनावली आहे.

यासिन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर...

  • यासिन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तानने या मलिकच्या शिक्षेचा निषेध केला.
  • एनआयए न्यायालयाच्या परिसरात मलिक विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
  • काश्मीर खोऱ्यात दगडफेक करण्यात आल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला तसेच खबरदारीचा उपाय म्हणून सर्व कंपन्यांनी इंटरनेट सेवा स्थगित केली आहे.
Tags:    

Similar News