१ मे रोजी कामगार आता कामगार दिन नाही तर निषेध दिन म्हणून करणार साजरा

Update: 2022-04-28 12:34 GMT

१ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.हा कामगारांचा दिवस मानला जातो.मात्र केंद्रसरकारच्या एका कायद्यामुळे कामगार हा दिवस कामगार दिन म्हणून नाही तर निषेध दिन म्हणून पाळणार आहेत.

महाराष्ट्र दिनी केंद्र सरकारच्या कामगारविरोधी कायद्यांचा निषेधार्थ कामगार संघटना संयुक्त कृती समितीची राजभवनावर बाईक रॅली काढणार आहे.हे कायदे रद्ध करण्यासाठी हि रॅली काढण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने कोरोना काळात संसदेत 44 पैकी 29 कामगार कायदे वीस मिनिटात मोडीत काढून पुढील पाच मिनिटात 4 लेबर कोड चर्चा न करता आवाज मताने पास केले. कामगारांना देशोधडीला लावले आहे. 1 जून 2022 पासून हे 4 लेबर कोड अमलात आणणार आहेत. हे 4 लेबर कोड कामगारांकरिता नसून भांडवलदारांकरिता आले आहेत व राज्यामार्फत नियमावली येत आहे.

केंद्र सरकारने हेच 4 कोड रद्द करावे आणि महाराष्ट्र सरकारने नियमावली रद्द करावी या मागण्या घेऊन कामगार संघटना संयुक्त कृती समिती 1मे जागतिक कामगार दिनानिमित्त कामगार विरोधी कायदा चा निषेध दिन पाळणार आहेत. सरकारवर दबाव आणण्यासाठी एक अभिनव विरोध प्रदर्शन मोटर बाईक रॅली काढण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. पुणे ते महाराष्ट्र राजभवन, मुंबई पर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे.

Tags:    

Similar News